पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जयभीम म्हणायला वाटतो मला गर्व ...

चौदा एप्रिलला जन्मले भीमराव ,
शिकून मोठे जगात केले त्यांनी नाव .

किती आली दुःखे , किती आली संकटे ,
भीमराव लढले सर्वांशी एकटे .

गळ्यामध्ये आमच्या वाडग झाडू राही पाठी ,
खूप संघर्ष केला आम्ही जगण्यासाठी .

भीमरायांनी आम्हाला माणसात आणले ,
माणुसकी हाच धर्म हेच त्यांनी जाणले .

शिका , संघटित व्हा , संघर्ष करा ,
त्यांनीच दिला हा मूलमंत्र खरा .

भीमरायांमुळे आम्हाला मिळाला मान ,
म्हणून म्हणतो तुम्ही पण वाचा संविधान .

भीमरायांनी आमच्यासाठी केले होते सर्व ,
म्हणून जयभीम म्हणायला वाटतो मला गर्व .

भीमराव नसते तर आम्हीपण नसतो ,
गावाबाहेर कुठेतरी भटकत असतो .

© धनराज संदेश गमरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू