पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुसंगती

सुसंगती


सायली आणि जुईली लहानपणी पासून च्या खऱ्या मैत्रिणी. दोघीही एकाच वर्गात होत्या. एकाच क्लासला दोघीही जायच्या. सायलीच्या  घरी तिचे आजी आजोबा पण असायचे. लहानपणी सायलीला नेहमी तिची आजी रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे, श्लोक  शिकवत असे,  तसेच घरातील छोटी मोठी कामे करायला पण शिकवत असे. प्रत्येक भाजी खायची सवय पण आजीनेच तिला लावली होती,  कारण आजी तिला प्रत्येक भाजीत असणारे गुणधर्म  समजावुन सांगत असे.

नशिबाने सायलीची नानी (तिच्या आईची आई) पण त्याच  गावातच राहत असे. तीची नानी खूपच अ‍ॅक्टिव्ह आणि हौशी होती. ती तर सायलीची व तिच्या मैत्रिणींची खास मैत्रिण होती. ती बर्‍याच वेळा देवाच्या किंवा इतर  बोधपर गोष्टी सांगुन प्रत्येक गोष्टीतला बोध शोधायला लावत, चुकले तरी शाबासकी देऊन परत जरा विचार करायला सांगत असे. कृष्ण आणि सुदामाच्या गोष्टीतून चांगल्या मित्रत्वाचा बोध सायलीला मिळाला तेव्हा  नानीने तिला  सांगितले  “बाळा आपण एखाद्याला अडचणीत मदत केली तर ती मदत आपल्याला लगेच नाही पण आयुष्यात कशी उपयोगी पडु शकेल” हे पण ह्या गोष्टीतून लक्षात घेतले पाहिजे. ईथे कृष्णा च्या मनाचा मोठेपणा अणी सुदाम्याचा स्वाभिमान नानीने समजावून सांगीतला. कौरव-पांडव यांची गोष्ट सांगतांना स्पर्धेचे महत्त्व किती लीलया पटवून दिले बघा - त्या काळी जशी गुरु त्यांची परीक्षा घ्यायचे तश्याच आता तुमच्या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा असतात.  स्वयंवर ही पण एक स्पर्धाच असायची आणि जेव्हा आपण एखादी गोष्टं मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेतो तेव्हा पूर्ण क्षमतेने ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळते. द्रौपदी स्वयंवरात फिरत्या माशाला मारायचे होते, त्याला थांबवायचे होते.  त्यासाठी प्रत्येक जण फक्त प्रयत्न करत होता. पण अर्जुन;  त्याने  शांतपणे विचार करून ध्येय निश्चित केले. माशाला एक फेरी मारायला किती वेळ लागतो याचा अचूक अंदाज घेतला आणि त्या हिशोबाने माशाचे प्रतिबिंब पाण्यात बघून अचूक नेम लावला. बघा म्हणजे एका स्वयंवरात  क्षमता, ध्येय निश्चिती, आत्मविश्वास अश्या कितीतरी गोष्टी पारखल्या गेल्या.

खरं तर प्रत्येकाला एकच कार्य दिले गेले होते, पण  ते पुर्ण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी होती.  आजच्या काळात विचार केला तर शिव खेरा जसे सांगतात की “विनर्स डु नोट डु डिफ्रंट थिंगस, दे डु द थिंगस डिफरंटली” किती योग्य बघा. म्हणजेच काय? आपण शाळेत सगळेच विद्यार्थी असतो आणि शिक्षक सगळ्यांना सारखेच मार्गदर्शन करतात पण जे विद्यार्थी नीट लाक्ष देऊन अभ्यास करतात, किंव्वा शिक्षकांनी सांगितलेल्या ईतर गोष्टी जसे नेहेमी  आपली कामे वेळच्यावेळी पुर्ण करणे, रोजच्या घडामोडींकडे लाक्ष ठेवणे आणि त्याप्रमाणे स्वत:मध्येच बदल करणे, ईत्यादी; ती मुले भविष्यात नक्कीच यशस्वी होतात.

खरं सांगू का बाल मित्रांनो जे आपण शाळेत शिकतो, आणि  कृतीत आणतो तीच आपल्या पूर्ण आयुष्याची शिदोरी असते आणि ती आपल्या मेमरीत कायम स्टोअर होऊन जाते. जसा दहीहंडी किंवा लोगोरीत पाया भक्कम असला की वरचे थर सहज रचले जातात, तसेच आपण आपल्या शिक्षकांनी सांगितलेल्या मौल्यवान गोष्टी अमलात आणल्या तर कितीही मोठी अडचण आली तरी आपण शांतपणे विचार करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो.  आणि हेच सर्व सायलीची नानी तिला हसत-खेळत किंवा रोजच्या जीवनातले उदाहरण देऊन समजावून सांगत असे. 

इकडे जुई कडे फक्त तिची आई बाबा आणि छोटा भाऊ एवढेच लोक घरात होते. आई कामावर गेल्यावर जुई अणी जय पाळणाघरात राहत. त्या काकू सगळ्या मुलांना प्रेमाने सांभाळत, गरम जेवण वाढत, नीट काळजी घेत पण प्रत्येकाचा अभ्यास घ्यायला, किव्वा गृहपाठ बघण्यास त्यांना वेळ मिळत नसे. तीथे काही  लहान मुले पण होती, ज्यांच्याबरोबर खेळायला जुईला खूप आवडे तसेच तिचा छोटा भाऊ पण तिथेच असायचा, त्यामुळे हल्ली बर्‍याच वेळा तीचा गृहपाठ अपूर्ण असे. कुठल्याही ईतर परीक्षांमध्ये किंव्वा स्पर्धांमध्ये ती भाग घेत नसे. खरं तर जुई पण सायली सारखीच हुशार आणि हरहुन्नरी होती. मग अताशा जुईचे बघून सायली पण कधीकधी गृहपाठ अपुर्ण ठेवी, कुठल्याही परीक्षेला किंव्वा स्पर्धेत भाग न घेता खेळण्यात किंवा मोबाईल गेम मध्ये हरवून जाऊ लागली होती. सायली च्या नानीच्या चाणाक्ष नजरेत ही गोष्ट लगेच आली. मग ती एक दिवस जुई च्या आईशी याबाबत बोलली आणि शाळा सुटल्या वर जुईला पण सायली बरोबर शनिवार-रविवार आपल्याकडे बोलावू लागली. या दोन दिवसात नानी त्यांच्यासाठी काहीतरी खेळायला म्हणून नवीन टास्क देत असे - जसे सायकल चालवणे, धावणे, लंगडी, लगोरी, बुद्धिबळ इत्यादी. ज्यामुळे मुलींचा चांगला व्यायाम व्हायचा, तसेच बुद्धिबळ खेळताना प्रत्येक चाल कशी विचार करून खेळायची, किव्वा कधीही शांतपणे  विचार करून मार्ग कसा ठरवायचा असे  मौलिक मार्गदर्शन नानी करीत असे.

खेळताखेळता मध्ये मध्ये पाढे किव्वा काही पाठांतर पण सहज होऊ लागले. दोघी मैत्रिणी पुन्हा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागल्या. नानीचे  नेहमीचे वाक्य असे  “हार किव्वा जीत, आपल्या दोघींमध्ये पक्की प्रीत”. म्हणजे स्पर्धा कुणीही  जिंकली तरी जल्लोष करायचा. नानी त्यांना नेहमी सांगत असे कि स्पर्धेमुळे किती तरी नविन  गोष्टी शिकायला मिळतात. पण हे ध्यानात ठेवा थोडे जरी प्रयत्न कमी पडले किंवा अचूक नेम नाही धरला तर थोड्या साठी हार होऊ शकते; पण  हरल्याचे दुःख न करता आपण किती नवीन ज्ञान मिळविले जे आपल्याला भविष्यात नक्कीच  उपयोगी पडेल एवढे लक्षात ठेवा.  तसेच आपले प्रयत्न कुठे कमी पडले किंवा ध्येय गाठण्याचा मार्ग चुकला का हे  समजुन घेतले पाहिजे. तसेच प्रत्येक स्पर्धका कडे खूप काहीतरी नक्कीच असते ते आपण शिकले पाहिजे आणि पुढच्या वेळी हे सगळे आत्मसात केले तर यश आपलेच आहे. नानीच्या प्रोत्साहनामुळे दोघींमधील चढाओढ परत त्यांना पुढे नेऊ लागली. त्यासाठी जुईची आई शनिवार-रविवार जुईला नानी कडे सोडण्यासाठी ऑफिस मधून लवकर येत असे. नानी सारखी योग्य मार्गदर्शक मिळाल्याने दोघीही अभ्यासातही अणि  ईतर क्षेत्रातही खुप हुशार झाल्या. तर बाल मित्रांनो प्रत्येक चांगली गोष्ट किंवा शिक्षकांनी किंवा आई बाबांनी सांगितलेले काम करून बघण्याचा प्रयत्न करा,  चुकण्याची, पडण्याची भीती नको, शिक्षक आणि पालक तुम्हाला सांभाळायला सक्षम असतात. तर नवीन वर्षात नवीन संकल्प करा “आम्ही करू चांगल्याच गोष्टी ज्याला शिक्षक आणि पालक देतील पुष्टी” 

Vrushali Kishor Mulay 

9833306701 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू