पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

काय गमावले काय कमावले

दोन हजार एकवीस वर्ष सरले 
मी काय गमावले काय मिळवले? 

तीनशे पासष्ट दिवस गमावले 
आणि तीनशे पासष्ट अनुभव कमावले

दररोज सकाळी एक चंद्र
आणि दर संध्याकाळी एक सूर्य हरवला
पण दर रात्री एक नवीन स्वप्न आणि
रोज सकाळी एक नवा विश्वास मिळाला.. 

गमावल्या समुद्राच्या कितीतरी उंच लाटा
आणि हरवल्या तुला भेटण्याच्या सर्व वाटा... 
विखुरलेल्या लाटेतून सापडले 
मला नव्या उमेदीचे शंख शिंपले 
आणि हरवलेल्या वाटेत नव्याने 
मीच मला गवसले.... 

शब्द हरवले, अर्थ हरवले...
कितीतरी कविता न लिहिताच हरवल्या
हरवलेल्या कवितांमधुनी
नवनिर्मितीच्या ओळी सापडल्या.. 

वेळ हरवली अन् गमावली व्यक्ती 
आठवणी कमावल्या अन् मिळवली नाती

दोन हजार एकवीस.. 
तू खुप काही घेवून गेलास.. 
पण जाता जाता "दोन हजार बावीस"
एक अंक अधिकच देवून गेलास..... 

©ऋचा दीपक कर्पे






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू