पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नाताळ आणि सुट्टी

          " नाताळ आणि सुट्टी "

 

 

नाताळ सण म्हणजे मुलांची मज्जा

ऑल टाइम फेव्हरेट सांताक्लॉज

केक चॉकलेट आणि खूप खाऊ.

 

 

सुट्टी पडली म्हणून सर्व मुले खूप खूष होती.

10 दिवस नाताळ ची सुट्टी, खूप मज्जा करायची,

 

खूप खेळायचं असे विलोक अनाया,तनु, ब्लेसम, परी, समृद्धी, सर्विल, तिर्थ, विजय या बच्चा पार्टी ने प्लान केला होता. सर्व मुलं आपापसात बोलत होती.

 

आपण कुठे जाणार काय करणारे हे संभाषण चालले होते. मी हळूच ऐकत होतो. बिल्डिंग मध्ये आता बरेच लोकं आधीच सुट्ट्या बघून  बाहेरगावी गेले होते.

 

बरीच लोकं कोरोना कमी झाल्यामुळे बाहेर गेली होती. देव करो नी कोरोना कायमचा जावो.

 

असो 

 

बच्चा पार्टी खूप आनंदात एकमेकांना काही बाही बोलत होती.

त्यात सर्वजण 4 वर्ष ते 12 वर्ष वयोगटातील होती.

 

प्रत्येकाला आपल्या सुट्ट्या कशा मजेत आणि उपयोगात आणयच्या हे एकत्र मिळून ठरवायचे होते.

 

समृद्धी : मी माझ्या मामाच्या गावी जाणार आहे. तिकडे आम्ही  माझ्या रॅलेटिव्ह च्या लग्नाला जाणार आणि नंतर आजीला भेटणार. लगेचच दोन दिवसांनी परत मुंबईला येणार. तुम्हाला भेटायला आणि ख्रिसमस पार्टी करायला.

 

 

तेव्हा विलोक म्हणाला  :   मी  नाताळ च्या सुट्टीत माझ्या (निवेदिता )माऊ मावशी कडे जाणार आणि तिला सोबत घेऊन खरेदीला जाणार. खेळणी, कपडे खाऊ घेणार. नंतर मी पप्पा बरोबर माझ्या काही नवीन मित्रांना पण भेटणार आहें.

 

 

ब्लेसम :   मैं भी हमारे घर में ख्रिसमस ट्री और डेकोरेशन करने वाला हूँ. मेरी मम्मी, डॅडी को हेल्प करता हूँ. केक चॉकलेट लायेंगे. हमारे घर में सांताक्लॉज  लायेंगे, ट्री लगायेंगे. और  रात में डॅडी मम्मी के साथ मे चर्च भी प्रे करने को जायेंगे. मेरे डॅडी मुझे नये कपडे भी लाये है. मैं सबको केक खाणे को बुलाऊंगा. तुम सब हमारे घर को आना प्लीज.

 

अनाया :   मुझे भी ख्रिसमस का छुट्टी में ब्लेसम के साथ उसके घर जाना है. उसकी मम्मी केक बनानेवाली है.

 

परी :   मी पण खुप मज्जा करणारे हे आणि माझे पपा मला खूप  ड्रॉईंग बुक आणि कलर आणून देणारेत. तेव्हा मी छान छान चित्र काढणार आहें. मला सांताक्लॉज ची टोपी पण काढायला येते.

 

विजय ( कान्हा ) :   काका मी आई, बाबांना घर डेकोरेशन करायला मदत करणार आणि आपल्या चिन्याला ( डॉगीला ) नवीन गळ्यातला बेल्ट आणणार आहें. माझ्या पिगीबँक मधून.

 

तनु : मी ना काका माझ्या स्कूल फ्रेंड्स च्या घरी जाणार आहें.

आणि माझी जुनी खेळणी त्या गरीब झोपडपट्टीतल्या मुलांना देणार आहे.

 

वाह   छान. बाळा असे मनातंच म्हटलं

सगळ्यांना आपापले म्हणणे उत्साह आणि रंगवून सांगण्याचा आनंद होतं होता. ते पाहून मी न राहवून सर्वांना आवाज दिला. आणि बोलावून घेऊन विचारलं की कुणाकुणाला नाताळ मद्ये कोण भेटायला येणार ते सांगा.

 

हे ऐकून लगेचच

 

तिर्थ : काका आपल्या बिल्डिंग मध्ये 25 डिसेंबर ला रात्री सांताक्लॉज येणार आहे आणि आम्हाला गिफ्टस देणार आहेत.

 

लगेचच

विजय ( कान्हा ) : काका मागे पण तुम्ही आम्हाला रंग बिरगी पतंग दिल्या होत्या व सोबत पेन्सिल बॉक्स, चॉकलेट पण दिले होते. मला माहीत आहे.

 

मला (कान्हा )विजयचे कौतुक वाटले कारण मी  दोन वर्षां पूर्वी 2019 ला सांताक्लॉज  बनून बिल्डिंग च्या सर्व बच्चा पार्टी ला गिफ्ट्स दिले होते. ते कान्हा च्या स्मरणात अजूनही होते.  नेमकं सर्व गोष्टी मला आठवत सांगू लागला.

 

याहीवर्षी मला मुलांना सांताक्लॉज बनून गिफ्ट्स द्यावे वाटत होते.

 

पण मुलांनी त्याचें प्लान स्वतःच आखले होते म्हणा हवं तर.

 

मग विचारलं.

 

तर तेव्हा मुलं म्हणाली काका या वेळी आपण  सर्व वेगळे काही करू या.

 

मी शांतपणे  ऐकत होतो.

 

आम्ही सर्वजण  मिळून एकत्र ' चिन्याला व मनी ला ' घर तयार करणार आहोत आणि रोज त्याच्या सोबत खेळणार आहोत.

 

 

चिन्या म्हणजे छोटा डॉगी पेट, मनी म्हणजे मांजर.

 

तिला बाळ होणार होते म्हणून मुलं खूप काळजी घेत होती.

 

 

कुणी जुनी टिफिन, छोटे पाण्यासाठी ताट, वाटी असे आणून ठेवणार असे सांगितलं. थंडी आहें म्हणून घरून जुन्या चटइ, चादर आणून टाकणार होते. काय ते एवढ्याश्या जीवावर प्रेम..

 

त्या सर्व मुलाचं चिन्या आणि मनी वर खूप माया होती. 

 

मला या चिमुकल्या मुलांच्या प्राणी प्रेमा बद्दल खुप कौतुक.  वाटले.

माझ्या मुलाला विलोक ला मी स्वतः लहान मुलांना वाढदिवसाच्या भेटी देण्यासाठी मी ' चिल्ड्रेन होम्स ' ला नेत असतो म्हणून त्याला आता खूप ओढ निर्माण झाली हे मला कळून चुकले होते.

 

जेव्हा सर्व मुलं नाताळ आणि सुट्टी प्लान बद्दल ठरवून आपा-आपल्या घरी गेले. तेव्हा विलोक ला घरी बोलावून विचारले तुला काय करायला आवडेल या नाताळ सुट्टी त.

विलोक म्हणाला : पप्पा  आपण माऊ मावशी कडून आलो की खुप ,मज्जा करणार आणि आपण माझी जुनी सायकल ना आपण त्या गरीब संस्थेतील मुलाला देऊ या. ते खूप खूष होतील. व माझी जुनी स्टोरी बुक पण देऊ या.

चालेल ना, पप्पा.

 

मीही   होकाराथी मान डोलावली आणि मनातून सुखावलो.

हल्लीची  लहान मुलं आपल्या कमी वयात किती मोठं कार्य करण्यासाठी तयार झाली आहेत.

 

 

मला कायम मुलांसोबत नाताळ आणि सुट्टी  या पुढेही 

 

वेग वेगळी आणि समाजोपयोगी होईल अशी आशा वाटते.

 

 

मुलांनी इतकी प्रेमाने काही करण्याची वृत्ती पाहून मला खरोखर त्यांचं कौतुक आणि नवल वाटलं.

 

 

 

सर्व लहान मुलांना,

 

' मेरी ख्रिसमस.  '  आणि

 

नवीन वर्षाच्या 2022 च्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

 

 

 

 

                                 : समाप्त  :

 

श्री. लव क्षीरसागर

विक्रोळी मुंबई.

9867700094

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू