पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

टण्णू ची खोड मोड

      टण्णू ची खोड मोड

अगं रेशमा !!! , करिष्मा !!! , अनय!!!! , तनिष्क !!!! 

तुम्ही काय करता हात मार हाण भांडा भांडी  !!!!! 

तुम्हाला माहित आहे का टण्णू ची खोड मोड कहाणी ????


नाही आज्जी !!!! सांग  ना लौकर सांग ना काय खोड मोड ते ????

बरं ऐका बसा शांत माझ्या जवळ आणी ऐका :-


एक खूप छान गांव होत नाव होतं *घोसाळ*, त्या गांवात खूप छान व शिस्तशीर  लोक रहात असत ,खूप लहान लहान  मूलं आणी मुली राहात ते मोठ्यां चे खूप आदर करत व त्यांचे चांगल्या गोष्ठीं ऐकत असे  .


परंतु त्याच गावात टण्णू नावाचा एक मुलगा होता तो कोणाच्याच गोष्ठी ऐकत नसे, खूपच उडाणटप्पू होता , सतत वडिल धारी यांचा अपमान करत व कांही ही त्यांचे ऐकत नसे!!!! .


खेळाच्या मैदानात ही खेळी मेळीने राहात नसे !!!, मारा माऱ्या करित!!! , दंगे करीत !!!! , पळता पळता मुलींचे वेण्या ओढून त्यांना खाली पाडित !!!! , मुलांना टंगड्या अडवून पाडित !!! असे , तो आला कि मैदानात थैमान घालित असे ,


 जो पर्यंत त्याला चार लोक उचलून टांगा टोळी करून घरी नेत नसत तोपर्यंत कोणिच नीट खेळू शकत नसे !!!!!


. घरच्या लोक ही त्याला समजावून थकले , पण तो कोणाचेच ऐके ना !!!!!! .

पुढे सकाळी शाळेत जाताना ही तो तसेच वागत असे , व शाळेत ही दिवस भर असेच धिंगाणा घालत असे , 

अभ्यासा चे नांव नाही !!!! 

त्याला गुरुजींनी ही खूप समजावले  !!!, शिक्षा केली !!! मार दिला !!! तरी ही त्याला काSSही समजे ना !! , अजून रागा नी तांडव करीत असे!!!! .


एक दिवस शाळेत गुरु जीं ने एक नियम काढला एक भला मोठा आरसा दाराशी ठेवला आणी प्रत्येक मुला मुलींना सांगीतलं ह्या आरश्यात स्वतः चे प्रतिबिंब बघून चेहरा व मूढ नीट करून, आपल्या चेहर्‍या वर हास्य पसरवून मग आप आपल्या वर्गात जावे !!!!.


सर्व मुलं मुली घरून कांही कांही विचार करून शाळेत येत , मूढ कधी खराब ही असी , परंतु आरश्या मध्ये आपला चेहरा पाहून नीट करून हँसत मुख करून आपल्या वर्गात जात !!!! , व त्यांचा पूर्ण दिवस पुढे छान जात असे!!! .


परंतू हा उडाण टप्पू टण्णू ,घरूनच कुचाळ्या करत निघाला, शाळेत आला आणी ...आणी ... आणी ....

आरश्या समोर उभा राहून वेडी वाकडी तोंड व वेड्या वाकड्या वाकुल्या करू लागला , आणी वर्गात ही अशेच नेहमी प्रमाणे वेड्या सारखे चाळे करू लागला  ,

आता हा रोजचाच नियम झाला होता , त्यांने रोज रोज नविन नविन चाळे करून सर्वांचा जीव मेटाकू टीस आणला होता .


एक दिवस त्याच आरश्या समोर वेग वेगळाळे चाळे करताना गोल गोल फिरून पायाने पंच मारु लागला !!!! .

एक जोरदार पायाचा पंच त्या आरश्या वर पडला  !!!! 

आणी आरश्या चे शेकडो तुकडे झाले !!!! ,

तोही तोल ना आवरून जमीनीच्या वर पडला गडबड लोळला !!!! , 

व आरश्या चे किती तुकडे त्याच्या शरिरात शिरले व नाका डोळ्यातून रक्त वाहू लागल , जबड्या ला मार बसून दांत ही तुटले !!!!तो जोर जोराने किंचाळू लागला !!!!!

आईं गं !!!!. आई गं !!!! आई गं !!!!


एक क्षण सगळेच स्तब्ध होते !!!!!

 पण !!!!!

 दुसऱ्या क्षणी सर्व मित्र मैत्रीण व गुरुजीं नी मिळून त्याला इस्पीतळात पोहचवलं , तो बेशुद्ध होता व त्याचा उपचार चालू लागला .


पुढ़े रोज रोज त्याचे मित्र, (ज्यांच्याशी तो भांडायचा ) , ते फुलं फळं चाकलेट बिस्किट, घेऊन त्याला भेटायला यायचे व तू लौकर बरा हो हं !!!!!आम्हाला तुझ्या शिवाय करमत नाही रे !!!!! असं बोलायचे .

त्याच्या डोळ्या तून घळा घळा आसंव निघायचे !!!! 

बोलू शकत नव्हता परंतु त्याला खूपच पश्चाताप होत !!!!! , 

कि ज्यांना मी इतका त्रास देत होतो ते मला बरं व्हाव म्हणून इश्वराला प्रार्थना करत आहेत !!!!! .

त्यांचे मन पश्चातापा ने भरून गेले डोळे खुलले व त्यांचे मन संपूर्ण बदललं !!!!.

आता एक नवीन व शहाणा टण्णू तयार झाला होता !!!!.

व त्याच्या बदललेल्या स्वभावाने तो स्वतः ही आनंदी असत व दुसर्‍या नां ही आनंदी ठेवत !!!!!.

आणी हो . तो आता मोठ्यां चे बोलणं लक्ष्य देऊन ऐकत ही असतो बरं !!!


मग कळलं का पोरांनो मस्ती व मन मौज भांडा भांडी ची खोड कशी मोडते ?


हो ;!!!!आज्जी !!!! खरंच छानच समजली , आता आम्ही पुढे कुचाळ्या किंवा भांडा भांडी करणार नाही ,!!!!!! नाही  तर आमची ही खोड मोड व्हायची कि !!!!!

 .

बरं चला मग लागा पटापट अभ्यासा ला परिक्षा जवळ आली ना ? छान टक्यां नी पास व्हायचयं ??? हो कि नाही ???


होय !!!! आजी !!!! होय !!!!!


सुलोचना बेलापुरकर

     * अपराजिता *

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू