पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

विश्वास (अलक )

याला म्हणतात विश्वास

 

     नुकतीच एम .पी .एस .सी. एक्साम तिने

Crack केली होती .तिच्यावर अभिनंदनाचा

वर्षाव सुरू होता .तिच्या नवरोजीचा मित्र

अभिनंदन करायला आला .जातांना हळूच

तिच्या नवऱ्याला  म्हणाला,

"सांभाळून रहा बरं  - - - आता तुझ्या बायकोचा

हुद्दा ,तुझ्या पेक्षा वरचा झाला .तुला दबून रहावे

लागेल .तिच्या ताटा खालचे मांजर नको होऊस - -"

 

त्यावर तिचा नवरा ताडकन म्हणाला ,

 

"माझी ,प्रिया कोणत्याही हुद्द्यावर गेली तरी ,

मला नवरा आणि तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून नक्कीच

प्रेम आणि आदर देईल ,हा माझा विश्वास आहे .

तू माझी काळजी करू नको ."

 

यावर त्या मित्राचा चेहरा पाहण्यासारखा झाला

होता .



संगिता ताथोड

   

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू