पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्दफुले


कधी सावली सुखाची

कधी तडाखे उन्हाचे

कधी मन भरून हसणे

कधी आसवे दु:खाचे


उन सावलीचा

हा खेळ खेळतांना

कधी खळखळून हसणे

कधी वाट आसवांना


कधी मौन साचलेले

सुख दु:ख झेलतांना

वाचा फुटे कधीही

असह्य वेदनांना


हे भाव अंतरीचे 

शब्दफूल झाले

क्षण मूक वेचतांना

काव्यात सजवतांना... 



©ऋचा दीपक कर्पे













पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू