पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

धुके

सकाळ,दुपार,संध्याकाळ

नेहमी सारखेच आभाळ

उन्हाचा कवडसा ही नाही

सूर्य गेला ढगांच्या पल्याड


शेवंती अन् जाई- जुई

उन्हासाठी आसुसलेल्या

एक कवडसा जरा उन्हाचा

थंड भावना गुरफटलेल्या


गार-गार ते सुटले वारे

अंगावरती अहा! शहारे! 

तोच चंद्रमा त्याच धुक्यातून 

देतच आहे तेच इशारे


मोहरलेल्या रातराणीचा

सुवास भिनला आसमंतात

तुझ्या कवेतून निसटून गेल्या

आठवणी त्या क्षणा क्षणात... 


धुक्यात लपल्या आठवणी अन्

प्रेम हरवले याच धुक्यात

अंधुक झाली तुझी आकृती

जपुन आहे अजुन मनात... 



©ऋचा दीपक कर्पे






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू