पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

त्रिधा राधा

सहज मनातलं--राधेच्या


त्रिधा राधा 


श्रीरंगा, तुझ्या रंगात रंगले मी पूर्ण....!!

तरीही सदा अपूर्णच राहिले मी, तुझ्याविना....!!

मी कायम तुझीच होते,पण कधीच झाले नाही मी तुझी...!!

युगानुयुगे फक्त होते निखळ, निरपेक्ष,निःस्वार्थ प्रेमाची एक मूर्तिमंत छबी...!!

खरंच, कोणतीच अपेक्षा नव्हती का त्या प्रेमात??...

तुझी ही अवस्था अशीच होती का रे कृष्णा?? अगदी माझ्यासारखी द्विधा?? ....

आणि समजेल का कधी दो हृदयांची ही अवस्था जनमानसाला??...

तू गोपसखा, गो-पालक, गिरिधारी, नटखट, शाम सावळा....!! आणि हो!..... योगेश्वर ही तूच.....!!

मी ही होते,संसारी, कुलीन,सर्व कौटुंबिक जबाबदारी पार पाडणारी....!!

तरीही अंर्तमनात सतत तुझाच ध्यास असणारी...!!

तुझ्या ओठांशी सतत बिलगून असणाऱ्या बासुरीचा सुद्धा रागराग करणारी मीच होते....!!

मन तुलाही होतं आणि मलाही.....!!

आणि हिंदोळणारी मनोवस्था ही दोघांची सारखीच....!!

लोकांनी नेऊन ठेवलं, उच्च पराकोटीला आपलं प्रेम...नि:स्वार्थी प्रेमाचं लेबलही लावलं,राधा-कृष्णाच्या प्रेमाला...!!

पण खरंच कोण होते रे मी तुझी?? सखी, प्रेमिका, जिवलग, की अजूनही काही?? .....!!

उत्तर शोधणं म्हणजे सुद्धा द्विधा आहे तुझ्या माझ्यासाठी...!!

पण इतके मात्र नक्की,तू सर्वस्व आहेस माझं...!! जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त तू आणि तूच दिसतोस मला ....!!

मी ही घेत राहिन जन्म, युगानुयुगे... फक्त तुझ्याचसाठी,आपल्या अंतर्मनातील प्रेमासाठी ..!!


*अंतरीची तुझ्या माझ्या* 

*समजेल का कुणा द्विधा*

*रंग तुझा मज जडला* 

*झाली सावळी तुझी राधा*

...©सौ मंजिरी भातखंडे

21/1/22

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू