पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजीची देवाज्ञा आणि चुकलेली शोकसभा

*****************

आजीची देवाज्ञा आणि चुकलेली शोकसभा 

*****************


आमची आजी अगदी भल्या पहाटे पहाटे देवाघरी गेली. घरामध्ये एकदम शोकाकुल वातावरण होऊन गेले होते . घरात सर्व जण रडायला लागली .

आम्ही त्यावेळी खूप लहान होतो, रडण्याचे कारण समजायला थोडा उशीर झाला,पण घरातले सगळेच रडतायत हे बघून मग आम्हीपण मोठ्याने भोकाड पसरले.????

पहाटेची वेळ होती,मग घरातील मावशीने आम्हाला हळूच बाजूला कोपऱ्यात घेतले आणि रडा पण जरा हळू आवाजात रडा असा मोलाचा सल्ला दिला.????


आमच्या रडण्याच्या हक्कावर आज पहिल्यांदा गदा आली होती , पहिल्यांदा कोणीतरी प्रेमाने आज आमच्या रडण्याकडे लक्ष दिल होत, नाहीतर इतर वेळेस आमच्याकडे दुर्लक्ष केले जायचे. घरातील आजीला काहीतरी झालय आणि आता ती परत बोलणार नाही हे आम्हाला समजले होते,पण आजी पेक्षा घरातील इतरांचे भयानक रुद्रवतार बघून आम्ही त्यालाच जास्त घाबरलेलो होतो . हळू हळू जशी सकाळ झाली तशी रडणारी चेहरे आम्हाला स्पष्ट दिसायला लागली.????


बहुतेक जणांना रडतांना आम्ही याची देही याची डोळी पहिल्यांदा बघत होतो. आणि रडतांना दिसणारे विचित्र चेहरेही अनुभवत होतो.????


आमच सगळं एकत्र कुटुंब होत त्यामुळे घरात लहान मुलं खूप होती. त्या दिवशी कोण कश्यासाठी रडतंय हेच कोणाला कळत नव्हतं.????

हळू हळू जवळचे नातेवाईक जमा व्हायला सुरवात झाली. घरामध्ये गर्दी वाढून जीव गुदमरायला लागला तस हवा येऊ द्या, हवा येऊ द्या अस कोणीतरी मंत्र जप केल्या सारखं मधून मधून बोलायचा.रडण्याचे प्रमाण अजूनही ओसरत नव्हते. कोणाला अचानक उफाळून आले की तो पुन्हा जोराचा सूर लावून रडायचा आणि तो रडायला लागला की दोन चार जण बारीक आवाजात रडायचे आम्ही सगळे त्या व्यक्ती कडे मात्र भावुक मुद्रेने बघत.????


जुनी लोक रडताना एक वेगळाच सूर लावायची. आमच्या एका नातेवाईक आजीने त्या दिवशी आमच्या आजी बरोबर घालवलेल्या सर्व आठवणीची एका सुरात जात्यावर वरच्या गाण्यासारखी आजीच्या आयुष्यावर आयुष्य गीतच सादर केलं. पूर्वी असेच सगळेजण रडायचे.  त्या रडण्यातून सगळ्या आठवणी त्या देवाघरी गेलेल्या व्यक्तीला सांगत.आम्हाला त्या वेळी  प्रश्न पडायचा की कोण आहे ऐकायला?

जिचे गुणगान गाताय ती तर गेली.????


जवळचे आणि लांबचे नातेवाईक हळू हळू जमा व्हायला लागले. आमच्या आईची आत्याही गावाकडून  निघाली, तिच्या सोबत आमच्या मामी आणि आत्याची मुलगी होती.

आम्ही ज्या कॉलोनीत रहायचो ती घरे सर्व दिसायला एक सारखीच. नवीन पाहुणा आला की हमखास चुकणार म्हणून समजा.

आत्या ही कित्येक वर्षानंतर गावातल्या बस स्टॅन्ड वर उतरली. विचारत विचारात घरचा पत्ता शोधू लागली आणि जेव्हा घराजवळ आली तेव्हा नेमकी आमच्या समोर राहणाऱ्या कुटुंबातील आजीही सकाळीच देवाघरी गेल्या होत्या आणि त्यांचीही सर्व तयारी चालु झाली होती. त्यांचेही नातेवाईक जमा होत होते.

आणि गंम्मत इथंच झाली...????


आमची आत्या तर रडायला इतकी आतुर झाली होती की कधी घरी पोहचेल आणि सर्व दुःख माझ्या शब्दात मांडेल असं झाल होत.

एव्हाना आमच्या आजीचा सर्व क्रिया कर्म करून सगळे घरी आलेले होते. मात्र समोरच्या आजीची मात्र स्मशानात नेण्याची तयारी जवळपास झाली होती. आमची आत्या आली आणि तिने बघितले की लोक बसलेले आहेत. प्रेत यात्रा आता निघणारच आहे आता आपण रडायला सुरवात केली पाहिजे

मग काय...????


सरळ आमची आत्या त्या कळपात घुसली आणि तिघींनी पण काहिही न बघता आत साठवलेले सर्व दुःख दुसऱ्याच आजीच्या  नावाने दिलखुलास पणे खाली करायला सुरवात केली. त्या दुःखाच्या भरात अनोळखी बाजूला बसलेल्या महिलांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या आणि त्याही महिला काही क्षण गोंधळून गेल्या.पण कोण कोण नातेवाईक आलेले आहेत हे कोणाला माहित नव्हतं त्यामुळे त्याही महिलांनीही त्यांच्या दुःखाचा मूक संमतीने स्वीकार केला आणि आमच्या आत्याला मिठी मारली तेवढ्यात.......


आमची आईची नजर समोर त्यांच्या घरातून समोर बसलेल्या आमच्या आत्या कडे गेली.

अग बाई... ही तर आपली आत्या!!

ती तिथं का रडत बसली??


आमच्या आईच्या लक्षात तिची चूक लगेच आली.  आईने पदर सावरला आणि हळूच बाजूने समोरच्या घराकडे जाऊन आत्याच्या खांद्याला हात लावला..

" अग आत्या, आम्ही तिकडे समोर राहतो.. इथं दुसरी बाई वारली आहे. हे आपले नातेवाईक नाही. " चल आपल्या घरी...????

अग बाई !! अग मला वाटलं तुम्ही इथंच राहता.

आमच्या आत्याच डोळ्यातून वाहणारे पाणी हे नगरपालिकेच्या नळाचे पाणी अचानक बंद व्हावे तसे बंद झाले...


आमच्या आत्याला मनातून खूप दुःख झाले ते हया करिता की उगाचच इथं रडत बसले..

तेथून उठतांना ती माझ्या आईला म्हणाली ", बाई उगाचच रडत बसले इतका वेळ. "

बाजूच्या बायकांना काय प्रकार झालाय हे कळायच्या आत आमची आई आत्याला मागच्या दाराने आमच्या घरात घेऊन आली..

आमच्या आईला पण हसू आवरत नव्हतं पण तिने मात्र ते ओठावरच अडवलं कारण इकडे आमच्या आईची सासू देवाघरी गेली होती.


©®प्रकाश फासाटे.

मोरोक्को

212661913052

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू