पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रजासत्ताक दिन विशेष लेख

भारत देश...

विविध भाषेचा, विविध पेहरावचा ,

विविध खाद्यसंस्कृतीचा,  विविध परंपरांचा

आणि ही सर्व विविधता जपणार्‍या एकात्मतेचा…..

अशा या प्रजासत्ताक दिनाच्या देशभक्तीमय शुभेच्छा 🙏


भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज 26 जानेवारी 2022 रोजी आपण सर्वजण  73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.



15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे  बलिदान सार्थकी लागले, आनंदीआनंद झाला खरा पण देशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून भारताचे संविधान लिहिण्यात आले. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणण्यात आले. त्या दिवसापासून भारत प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. आजच्या विद्यार्थी वर्गात हा प्रश्न नक्की विचारला जात असेल की 26 जानेवारी हीच तारीख का निवडली गेली. तर,  1929 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. याच दिवशी ब्रिटिशांनी भारताला अधिराज्य म्हणून राज्याचा दर्जा दिला होता. म्हणून 26 जानेवारी ही तारीख प्रजासत्ताक दिन म्हणून निवडण्यात आली होती.


प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. याच दिवशी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित केले.


प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस एक भारतीय म्हणून आपल्या प्रत्येकासाठीच महत्त्वाचा आहे.


या दिवशी देशाचे राष्ट्रपती राजपथ, नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करतात.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे  परेड.

या परेडमध्येच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणारे असे

प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक वैशिष्ट्य दर्शविणारे कलादर्शन!

भारतीय नौदल, भूदल, वायुसेना या तिन्ही दलांचे सेना विभाग तसेच घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रणगाडे यांच्यासमवेत हे संचलन केले जाते. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल या सर्व फौजांनी दिलेली मानवंदना स्वीकारतात.


यंदाचा प्रजासत्ताक दिन  इतर काही बाबतीत मात्र वेगळा असणार आहे. कारण 2021 प्रमाणे या वर्षीही प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम सहन करावा लागत आहे.  काही भागात शाळा, कॉलेज सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमीच आहे. आसपासची रुग्ण संख्या कमी होत असली तरी अजूनही संसर्ग प्रमाण कमी झाले नसल्याने अनेक ठिकाणी ऑनलाइन पद्धतीनेच प्रजासत्ताक दिनाचे उपक्रम आयोजित करण्याकडे आयोजकांचा कल दिसून येत आहे.


परंतु, 

कितीही प्रतिकूल असली तरी अशा परिस्थिती मध्ये देखील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जनमनात असलेला उत्साह दरवर्षी प्रमाणे कायम आहे. आजच्या काळात, जाती धर्म वर्ण पंथ इत्यादीतील भेद मागच्या शतकाच्या तुलनेने अनेक पटीने कमी झालेले आपण समाजात बघतोच. दिवाळी, नाताळ, ईद सारख्या सणाना आपण सर्वजण शुभेच्छांची देवाण घेवाण करत असतोच. पण तरी देखील हा आपला सण हा त्यांचा सण अशी भावना स्वाभाविकपणे प्रत्येकाच्या मनात येतेच.


परंतु, संपूर्ण भारतीयांच्या वतीने अगदी ठामपणे अभिमानाने आणि पूर्ण विश्वासाने हे विधान आपल्याला आज करता येईल की आपण कोणत्याही जातीधर्माचे असू , जगाच्या पाठीवर कुठेही असू,

परंतु स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन  हे दोन्ही दिवस आपण ' एक भारतीय ' म्हणून सारख्याच देशभक्ती मय भावनेने , उत्साहाने, आत्मीयतेने साजरे करतो.  एका सच्चा भारतीयाची हीच खरी ओळख आहे.



प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! आपला भारत देश चिरायू होवो!


जय हिंद!



प्रज्ञा पंडित

ठाणे



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू