पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रजासत्ताक दिन: आठवणी

???????? प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ????


◆हिंद भूमीचे जवान जे जे लढले सीमेवरती,   आणिक वाहिली जीवनपुष्पे त्वदिय चरणावरती स्मरूणि तयांचे बलीदान , वंदन त्यांना करा,
मनी वाहु द्दा देशप्रेम अन् मानवतेचा अखंड असा तो झरा...◆ 

 इंडियन  नेव्हीत असताना  1971 च्या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले माझे यजमान  श्री  विनोद अलोणे यांच्या "  प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित, मी लिहीत असलेल्या " BACK  2  THE  FUTURE" या कथा मालिकेतील प्रजासत्ताकदिनानिमित्त असणारा स्पेशल ऐपिसोड….

 "26 जानेवारी" आज आपल्या भारताचा73वा  प्रजासत्ताक दिन! स्वतंत्र भारतातील  प्रत्येक नागरीकाला अभिमान वाटेल असा हा दिवस!

 Yes , I am lucy person ! भारतीय नौदलात असतांना १९६९ ला  दिल्लीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या  परेडसाठी माझं त्यावर्षी सिलेक्शन झालं होतं .  आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा तसेच युद्धातील सामर्थ्य नागरिकांना बघता यावी म्हणून ही परेड आयोजित केल्या जाते, अगदी नेत्रदीपक सोहळा असतो..


त्यावेळी मी  "कोचीन" मध्ये, म्हणजे आता ज्यालाला "कोची " असे म्हणतात ,तिथल्या इंडियन नेव्हीच्या "venduruthy camp" मध्ये होतो . त्या वर्षी त्या परेड साठी नेव्हीच्या  वेगवेगळ्या ठिकाणच्या कॅम्प मधून आम्हा साठ जणांची निवड करण्यांत  आली होती….

             हो,एक वेगळाचं माहौल रहायचा त्यावेळेस. प्रत्येकाच्या मनांत देशाभिमान जागृत होता.भारताला स्वातंत्र्य मिळुन फार वर्षे झाली नव्हती...  गुलामगिरीतून निघुन स्वतंत्र भारतात मोकळा  श्वास घेत होते सगळे…. ज्यांनी        गुलामगिरी अनुभवली  होती त्यांना या गोष्टीची  जाणीव होती!
परेडच्या एक महिना आधीपासूनच आमचा मुक्काम दिल्लीत होता.जानेवारी मध्ये दिल्ली गोठुन जाते. त्या गारठवुन टाकणाऱ्या थंडीत आम्ही महीनाभर मोकळ्या मैदानात तंबु टाकून तिथे मुक्कामाला होतो. रोज पहाटे पाचला उठून तयारी करावी लागायची. सुरवातीला  तीन ते   चार  किलोमीटर अंतरापर्यंत  हातात रायफल घेऊन परेड करतां करतां वाढत जाऊन दहा किलोमीटर पर्यंत रोज परेडची प्रॅक्टिस  करवुन घेण्यात येत होती . राजपथावर आपल्या देशाचे मान्यवर तसेच परदेशी पाहुण्यांसमोर राष्ट्रध्वजाला मानवंदना करत जायला मिळणार ही ऐका सैनिकासाठी गौरवाची बाब असल्यामुळे आम्हाला रोज परेड करतांना करून घेण्यात येणारी मेहनत अगदी नगण्य वाटत होती…ऐक महीना संपत आला.. विजपथावर तसेच इतर ठिकाणी जिकडे तिकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तयारी सुरू झाली….

         पंचवीस जानेवारीला दुपारीच आम्हीआमचे कपडे प्रेसकरणं ,शूपाॅलीश करणं वगरै अशी  सगळी जय्यत तयारी  करून ठेवली होती .रात्री लवकरच निजानीज झाली. रात्र सरत नाही तोच पहाटे चारला जाग आली.  सर्वांना स्फुरण चढलं होतं ,ऐक अनामिक भावना तयार होत होती.    पहाटे पाचला नाव्ह्याची एक टिम येऊन  आम्हा सर्वांचं शेव्हिंग करून गेली आणि  आम्ही अप्-टू-डेट तयार होऊन, सकाळी सहाला  बाहेर धुकं असताना, कुडकुडणाऱ्या थंडीत ,हातात रायफल घेऊन राजपथाकडे परेड साठी निघालो . भुदल, नौदल व वायुदलाचे सैनिक शिस्तबद्धतेने "platoon" मधून चालत होते. कितीतरी group's  उपस्थित होते परेडला. काही ग्रुप आप-आपल्या प्रांतातील पारंपारिक व सांस्कृतीक देखावे  सादर करण्यांस आले होते….
                        विजय चौकातून बरोबर नऊ वाजता  परेड सुरु झाली .विजय चौक ते लाल किल्ला दहा किलोमीटर अंतर आहे आणि तिथपर्यंत  ही  परेड चालते. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी  मित्रदेशाच्या एखाद्या प्रमुख व्यक्तिला दरवर्षी आमंत्रित करण्यातं येत असते. आपल्या  देशाच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांसोबतच देशविदेशातील राजदूत व इतर मान्यवर  डायसवर उपस्थित असतातं, आपल्या  तिन्ही सैन्यदलाची परेड बघायला आणि आपल्या अद्यावत शस्त्र सामुग्रीचा आढावा घेण्यासाठी.

 राजपथावरून जातांना त्या अथांग  जनसमुदाया समोर ,शिस्तबद्ध पद्धतीने हातात रायफल घेऊन लयीत चालत ताठ  मानेने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतांना अंगातील अणुरेणु फुलुन आलं  होतं...लयबद्ध पाऊल टाकतांना जो अनुभव येत होता ,तो भारत मातेसाठी आण ,बाण ,शान पणाला लाऊन देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही सैनिक  म्हणून जे कर्तव्य आहे त्याची जाणीव देत होता. त्यानिमित्ताने ऐकप्रकारे देशाच्या संरक्षणाची जवाबदारी भुदल, नौदल,आणि वायुदलावर असुन त्याच्या ताकदीची जाणीव सर्वांना त्यावेळेस होत होती.आम्ही  दहा किलोमीटर चालत चालत लालकिल्ल्यापर्यंत  पोहचलो .  परेड करतांना अंगात स्फुरण चढलं होतं, देशाभिमानाने छाती गर्वाने फुलून आली होती. आपण देशाचा ऐक नागरिक असण्याबरोबरच  त्याच्या संरक्षणाची जवाबदारी आपल्या खांद्दावर आहे ही जाणिव आली होती.परेड पुढे पुढे सरकत लाल किल्ल्यापर्यंत जाऊन पोहचली.  बरोबर दहा वाजता राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला आणि मानवंदना देण्यात आली.
या परेडमध्ये एअर फोर्स आणि आर्मी यांचा सॅल्यूट करताना तळहात बाहेरच्या बाजूने असतो..तर नेव्हीचा  सँल्युट करतांना तळहात आतल्या बाजूने घेऊन केलेला असतो. या ठिकाणी आर्मी ,नौदल  आणि वायुदल यांचे वेगवेगळे ध्वज आणि आपला राष्ट्रध्वज फडकत असतो.

       परेडसाठी पहाटे पाच पासुन तयार झालेलो आम्ही ,आमच्या पोटात फक्त चहाच गेला होता .दहा किलोमीटर अंतर  चालून पोटात कावळे ओरडू लागले  होते. लालकिल्यावर  पोहोचल्यावर सर्वांना नास्ता देण्यात आला. 

                     देशभक्तीच्या भावनेने भारून भारताच्या तिन्ही सैन्यदलाने  1971 च्या युद्धात ऊत्तम कामगिरी बजावली...विषेष करून आमच्या नेव्हीच्या टीमने कराचीवर अटँक करून विजय संपादन करण्यास मोलाची कामगिरी बजावली…

आजही टिव्हीवर  वायु दलात दाखल झालेले अत्याधुनिक  विमानं ,त्यांच्या कसरती बघुन  डोळ्यांचे पारणे फिटते…दिडशे वर्ष पारतंत्र्यात काढल्यानंतर देशाने 75 वर्षात जगाच्या नकाशावर एक बलवान,सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून आपलं ऐक स्वतंत्र स्थान निर्माण केलं.म्हणूनच तो सोहळा ,त्या परंपरा  व त्याचे महत्त्व आपण भारतीयांना अभिमानास्पद वाटले पाहीजे.
                       
26 जानेवारीची परेड बघतांना,  जुन्या आठवणी जाग्रुत होतात, ऊचंबळुन येतात त्या भावना.  टिव्हिवर दिसणाऱ्या परेडमधील सैनिकामध्ये आपलीच प्रतीक्रुती असल्याचा भास होतो. शरीर ताठ ऊभं रहातं , मनातुन "सावधान" चा ईशारा मिळतो,  कपाळावर आपोआप  बोटं टेकली जातात,आणि टिव्हीवरच्या ध्वजाला  ऐक कडक सँल्युट ठोकला जातो आणि ऊत्स्फुर्तपणे ओठातुन शब्दं बाहेर पडतात….

!!जयहिंद!!
   
                       

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू