पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी... एक भारतीय!

ज्या प्रमाणे सैन्याचा जवानांना ,एक देशभक्त नागरिकाला जो अभिमान वाटतो कि मी भारतीय आहे तसाच अभिमान मला ही वाटतो की मी एक भारतीय आहे. दुर्दैवच म्हणावे कि ज्या भारत देशात श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण सारखे देवता अवतरले ,त्यांनी दिलेले ज्ञान आज ही श्री रामचरीतमानस आणि श्री भगवतगीता यांचा माध्यमातून आम्हीं वाचतो तरी पण हजारों वर्षापर्यंत माझा देशावर मुगल ,इंग्रजांनी अत्याचारपूर्ण शासन केले. ते फक्त आमचा मधील काही स्वार्थी लोकां मुळे. विचार करा फक्त काही हजार इंग्रजांनी करोड भारतीय लोकांवर आपले राज्य गाजवले.
चला जे झाले ते झाले... 
भारत माझा देश आहे. निसर्गाने त्याला भरपूर आशीर्वाद दिला आहे. उत्तरे कडे हिमालयाच्या पर्वत शृंखला आहे तर तिन्ही बाजूस तीन तीन महासागरांच्या अपार जलराशीनी त्याला आपल्या कुशीत जागा दिली आहे. आता वेगळ्याने सांगायला नकोच की हिमालय आणि सागर यांच्या अपार संपदेनी माझा देश अगदी संपन्न आहे. 
जसे प्रत्येक देशाचे आचार, विचार,संस्कृती ला लक्ष्यात ठेवून काही कर्तव्य निर्धारित असतात त्या प्रमाणे माझा देशाचेही एक लिखित संविधान आहे. त्यात भारतातील नागरिकांचे काही कर्तव्य आहेत.
आता प्रत्येकाने अगदी बॉर्डर वर बंदूक घेऊन लढायलाच गेले पाहिजे असे जरुरी नाही..सैनिक आहेत बॉर्डर वर लढायला ते आपले कर्तव्य करत आहे.
आपण तर आपापल्या परिने आपले कार्य (उदाहरण डॉक्टर,टीचर,वकील,ड्राइवर,व्यापारी,कृषक ई.)प्रामाणिकपणे केले तरी आपण कर्तव्य केले असे समजले जाईल. 
माणूस म्हणून अपेक्षा ही असणारच! 
पहिली अपेक्षा की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही जो चुकीचा इतिहास आम्हांला शिकवला गेला ,तो आमच्या पुढील पिढीला न शिकवला जावो. 
दुसरे ब्रिटिशांचा वेळेसचे किती तरी कायदे आज ही आहे. ते त्वरित बदलावे.
बँकेचे निगोशियेबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 ,पुलीस आणि कोर्टाचे कायदे ही ब्रिटिशांचा वेळेसचे. शिक्षण पद्धती ही लॉर्ड मॅकालेची. तर आता 75 वे स्वातंत्र्य दिवस आम्ही साजरा करण्याची तैयारी करत आहो तर आता जुने नेम कायदे सुद्धा बदलणे गरजेचे आहे. 
असेच देशाचे नाव ही इंडिया ऐवजी भारत केले पाहिजे. 
2014 पासून अर्थात जेव्हां पासून श्री नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व सांभाळले आहे तेंव्हा पासून बऱ्याच क्षेत्रात बदल दिसून येत आहे. ते आहे तो पर्यंत आमचाही अपेक्षा पूर्ण होतील असा भरोसा ठेवण्यात काही हरकत नाही. 
जय हिंद -जय भारत! 


दीपक कर्पे
देवास

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू