पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सिंधुताई सपकाळ

*सिंधुताई  सपकाळ*

_________________________


गलबताला  तू  लावलेले 

अजून  भक्कम  आहे सुकाणू 

जग म्हणेल  म्हणू  दे काही  

तू  गेलीस  असे मी का म्हणू ?


सांभाळीले उन  वार्यात आम्हाला

तुला  डोक्यावरची  सावली म्हणू

जग म्हणेल  म्हणू  दे काही

तू  गेलीस  असे मी का  म्हणू


झिजत  राहिलीस  सर्वांसाठी

जसे चंदनाचे की खोड  जणू 

जग म्हणेल  म्हणू दे काही 

तू  गेलीस  असे मी का म्हणू 


अनाथ  लेकरांची झालीस माई

 गंगा ही वाहताना  थांबली जणू 

जग म्हणेल  म्हणू  दे काही 

तू गेलीस  असे मी का म्हणून ?


    अरविंद  कुलकर्णी  - पुणे

     9834114379

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू