पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सिंधुताई

अश्रू झाले अनावर

कसं येऊ मी भानावर

नाव तुझं सिंधुताई

अनाथांची होतीस तू माई

ज्या समाजाने तुझ्या चारित्र्यावर उडवले शिंतोडे

त्या समाजाला तू शिकवलं देऊनी संस्काराचे गाठोडे

पतीने केलं तुला अमानूषपणे मारहाण

केलं तू त्याला एका झटक्यात माफ करूनी महान

सोसलीस तू दु:खाची झळ

त्या वेदनेनंच दिलं तुला जगण्यास बळ

आयुष्यभर केलं काबाडकष्ट

आपल्या संघर्षातून केलं प्रत्येक समस्येला नष्ट

तुझ्या वागण्यात होता साधेपणा

तुझ्या बोलण्यात होता प्रामाणिकपणा

आत्मचरित्र तुझे 'मी वनवासी'

दावते कसे बनावे साहसी

मोठमोठे पुरस्कार घेऊनी होते तुझे जमिनीवर पाय

खरंच होतीस तू अनाथांची माय

नाही गेलीस तू कधीही परिस्थितीपुढं शरण

आजन्म करतो मी तुझ्या कार्याला नमन


©®-विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती,अणदूर

ता.तुळजापूर

भ्रमणध्वनी-9326807480


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू