पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सगळ्यांची माई


 

 

प्रेम जगण्यावर, सदैव आनंदी, प्रेमळ आणि हुशार

जगाचा निरोप घेतला त्यांनी

माझ्या अतरंगातील खळबळ फार

 

ष्टांनाही भीती वाटावी

त्यांच्या वाटेवर जाऊनही परतीची वाट धरावी

 

काटे बोथट झाले

त्यांची हिम्मत पाहून माती झाले

 

दुष्काळ भिऊन पळाले

त्यांच्या समोर काय माझी बिसाथ असे म्हणाले

 

अश्रू दाटले

त्यांचा साहस ऐकून तळात लपले

 

अशिक्षितपणा कोमोजुन गेला

त्यांच्या तल्लख बुद्धीला नमस्कार करून निघून गेला

 

स्मशानही आनंदले

जगणे कोणीही फक्त त्यांच्या कडून शिकावे असे म्हणाले

 

अनाथांचा आधार

जन्म न देता त्या सगळ्यांच्या माई

 

भूतो ना भविष्यती

अश्या सिंधू ताईंना शत-शत प्रणाम

 

 

सौ. मीनल आनंद विद्वांस

 

 

 

 

 

 

 

 

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू