पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्यातील मी

माझ्यातील मीचा

करते मी आदर

हर संकटाला होते

ती हिमतीने सादर


माझ्यातील मीचा

करते मी सन्मान

सहत नाही ती

कुठलाही अपमान


माझ्यातील मी ला

ठेवते मी सुखात

रडत नाही कधी ती

कोणत्याही दुःखात


माझ्यातील मी कधी

दाखवीत नाही तोरा

देत नाही कधी ती

दुष्कृत्याला दुजोरा


सौ संगिता ताथोड



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू