पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उत्तरायण

विलोभनीय चंद्र

व शुभ्र चांदण्या

   जशा चमकतात ..

       काळ्याशार आकाशात... 


नव्या कोऱ्या

 काळ्या साडीवर 

हलव्याचे दागिने 

जसे उठून दिसतात...

 

तसेच उजळून निघो

तुमचे नि माझे

सुंदर सकारात्मक विचार

दु:खाच्या अंधारात अन्

संकटांच्या काळोखात....!


हरवलेल्या मित्रास

 सापडो एक प्रकाशवाट... 

भुकेल्याला मिळो 

रोज चून भाकरीचे ताट.. 


उमेदीची पतंग उडो 

 उंच उंच आकाशात.. 

उत्तरायणाचा सूर्य आणो

सुख समाधान आरोग्य

सर्वांच्याच आयुष्यात...! 



मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू