पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुपित प्रितीचे

गुपित प्रितीचे

 

लाजुन पाहण्याचा अन्

  पाहून लाजण्याचा 

हा खेळ झाला जुना 

सांग हळुच येऊन जवळी 

भाव तुझ्या मनातला .....

उगाच लाजुनि कां

छळतेस मनास माझ्या

उगाच राहुनि दुर अशि

कां पाहतेस अंत  

मनाचा तु तुझ्या .....

थरथर तुझ्या ओठांची 

नजर भिरभिरती तुझी

सांगतात खुशाल मजला

जरि हृदयी लपविलीस 

प्रित तुझी नि माझी .....

चोरून पाहण्याचा छंद , तुझा

नकळत मलाही जडला

अधिर नजर माझी 

होते किती अतुर 

नजरेस तुझ्या भेटायला.....

येते कितीदा मनात 

सांगावे तुज प्रेमाने

हे व्यर्थ असे खेळणे 

कष्टविणे तुझे तुझ्याच जिवास 

अन् वृथा हुरहुर माझ्या मनाला ....

हे असेच झुरणे मनाशी

पाहत स्वप्ने जागेपणी

जपलेला मोगरा तुजसाठी

जाईल तो हि सुकुनि .....

येशिल निमिष एक जवळी

माळीन मोगरा वेणीत तुझ्या

दरवळ त्याचा , कळवेल जगास

गुपित प्रितीचे, तुझ्या नि माझ्या ...

                  .. .. . प्रदिप राजे 

                                    पुणे

                  

 

                  

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू