पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अव्यक्त प्रेम

.........अव्यक्त प्रेम.......


प्रेम खरंच किती सुंदर शब्द !!

या शब्दामध्ये एक जादू आहे. एक किमया आहे.

आपण वयात यायला लागलो की प्रेमाचं पहिलं फुल मनात उमलायला लागत.त्याला हवं असत त्याच्या सारखंच दुसरं कोणीतरी अगदी त्याच्यावर मनापासून प्रेम करणार !!

ही वेळच अशी असते ना ती सर्वांना वेड बनवते. प्रेमवेडे म्हणतात ते उगाचच नाही.

प्रेम वेड असत,प्रेम आंधळं असत हे अगदी तंतोतंत खरं आहे. कारण एकदा का तुम्ही प्रेमात पडला की आपण त्यात डुबून जातो.


या वयात कोणीतरी अचानक आवडायला लागत, त्या व्यक्तीबद्दल मनात प्रेम निर्माण होत, तिच्याशी बोलावंसं वाटत, तिला बघत रहावस वाटत, सारखा तिचाच विचार मनात येतो, ती सारखी आठवायला लागते, प्रत्येक ठिकाणी तीच दिसू लागते. कधी ती शाळेच्या घोळक्यात दिसते तर कधी बस च्या गर्दीत, कधी मंदिरातील रांगेत, तर कधी चित्रपटातील नायिकेमध्ये ती दिसते आणि आपणही  त्या वेळी नायक केव्हा होऊन जातो ते कळत नाही.

तिच्या सगळ्या गोष्टी आवडायला लागतात.. तीच हसणं, तीच बोलणं तिचे हावभाव सगळं कस मनाला मोहून टाकत.


माझी सुरवात झाली ती अगदी शाळेपासून....

तिला शाळेत आमच्याच वर्गात पहिल्यांदा  बघितले आणि ती आवडायला लागली.

हया वयात आवडायला लागलेल्या मुलीबद्दल कोणाजवळ बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही.मन में एक लड्डू फुटा या

प्रकारा सारखं !!

 मग तिला सारखं बघावंस वाटे, तिच्याशी बोलावेसे वाटे. वर्गात असतांना तिला चोरून बघायचो. तिची प्रत्येक गोष्ट चांगली वाटायची मात्र ती समोर आली की छातीत धडधड होऊन मीच घाबरून जायचो  हे नेहमीच व्हायच.

ती का आवडायची हे मला कधी कळालं नाही  बहुदा हे अगदी पारदर्शीक आणि नितळ पाण्यासारखे स्वच्छ प्रेम असावं, कारण काही स्वार्थ नाही,अपेक्षा नाही फक्त आवडणे.!!


एखादी मुलगी आवडायला लागते तेव्हा काही खास कारण नसावं.बहुतेक आपल्या मनात एखादा आवडत्या चेहऱ्याचा साचा तयार असावा आणि त्याच्याशी आपल्या आवडत्या मुलीचा चेहरा  जुळला की ती  आवडायला लागत असावी अस त्या वेळी माझ मत होत  !!

मनाची त्या वेळी खूप उलघाल होत होती.बरेच चेहरे दिसले की त्यातूनही पुन्हा दुसर कोणी तरी आवडू लागे.

तो काळचं खूप गोंधळात पाडणारा होता. एकीकडे दहावी, बारावीचा अभ्यास आणि दुसरीकडे मनाची चाललेली ससेहोलपट, खरंच काय करावं सुचत नसायचं.


त्यातूनही घरातील लोकांचे, समाजाचे आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, आपली प्रतिमा, आपल्या कुटुंबाचे नाव, त्यांची इज्जत हे विचार सुद्धा मनात येत. आपण  प्रेमाच्या या आकर्षणात काही चुकीचे पाऊल उचलले तर काय भावात पडेल हा विचार त्या वेळी प्रेमात उडी मारतांना पाय मागे ओढायचा.

तिची जात, धर्म पुन्हा त्या ठिकाणी आडवा यायचा.

त्यामुळे सगळ्या गोष्टी, भावनांचे वादळ हे फक्त मनातल्या मनात चालायचे तेव्हा फक्त माझे मन त्याचे साक्षी होते .


त्या वेळी सर्वात जास्त भीती वाटायची ती ह्याची की प्रपोज केल आणि तिने तिच्या घरच्यांना सांगितले तर वाद होतील मग करायचे काय? आपली आणि सगळ्यांचीच इज्जत जाणार. आपल्या संस्काराचे धिंडवडे उडणार!!

ह्याच कारणामुळे 95% मुलं खरं प्रेम असूनही कधीच व्यक्त करू शकत नाही.

शाळेपर्यंत चे प्रेमाचे हे आकर्षण आपण समजू शकतो. पण जेव्हा कॉलेज ला आलो तेव्हा बऱ्यापैकी जबाबदारीची जाणीव असते. थोडेसे सुजाण झालेले असतो.


मला कॉलेज ला आल्यानंतर मात्र

एकदा अचानक आमच्याच गावातील एक मुलगी दिसताक्षणी खूप आवडली .

पुन्हा तेच.. का आवडली तर माहित नाही पण बहुदा मनातला चेहरा आणि तिचा चेहरा हे दोन्ही साचे जुळले असावेत.


त्या नंतर  तिची माहिती काढण्याची मोहीम मी सुरु केली . माहितीत समजले की ती आमच्या मित्राचीच बहीणच होती.

आता झाली का पंचाईत...?

ज्या मित्राच्या घरी नेहमी जाणे येणे होते, अगदी जवळचा मित्र होता त्याचीच बहीण मला आवडायला लागली होती.

आता तर मी मित्राच्या घरी पण भीतीने जाणे सोडले.

पण दररोज मात्र काही ना काही निमित्त काढून मी आणि माझा मित्र आम्ही तिच्या दारावरून फेरफटका मारायचो केवळ तिचा सुंदर चेहरा बघायला मिळावा आणि नजरानजर व्हावी एवढाच हेतू!!

दिवसेंदिवस माझी घालमेल वाढत चालली होती.

तिला मी आवडतोय की नाही हे मला अजून माहित नव्हते पण आमची नजरानजर होत होती.

आणि तिच्याही मनात आपल्या बद्दल काही तरी प्रेम आहे हे जाणवत होत.

कॉलेज वर मग मी तिला शोधू लागलो. तिचा क्लास, तिच्या जाण्या येण्याच्या वेळा, तिच्या मैत्रिणीचा घोळका यांचा शोध सुरु केला.

मी एकाकी हा सर्व खटाटोप करत होतो.

शेवटी एक दिवस न राहून संध्याकाळी गप्पा मारतांना मी पहिल्यांदा माझ्या मित्राजवळ विषय काढला...

मित्रा," एक सांगू का?

अरे मला आपल्या मित्राची बहीण आहे ना. ती खूप आवडायला लागली आहे..  काय करावं सुचत नाही. तू आता काही तरी मदत कर..."

"चल, आपण तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊ. तिला सांगू सगळे. ती मग बोलेल तिच्याशी."मित्राने मार्ग सुचवला.


आम्ही तिच्या मैत्रिणी च्या घरी गेलो..... पण..पण 


आम्ही तिच्याशी त्या विषयावर बोलूच शकलो नाही. आणि तसेच परत माघारी आलो.

अव्यक्त प्रेमाची भीती खूप वेगळी असते. 

तो विषय आणि ती ओढ तशीच राहिली. दिवस गेली,वर्ष गेली.

मला तर वाटत की माझी इच्छाशक्ती कमी पडली असावी , कदाचित माझ्या मनाने त्या वेळी माझ्या हृदयाचे ऐकण्याऐवजी त्याच्या वरच्या स्थानावर असणाऱ्या मेंदूचे ऐकले असावे.म्हणूनच ती गोष्ट मागे पडली पुढे कॉलेज संपले, नोकरी लागली पण,

ती आजही आठवते..

ती सध्या काय करते काहीच माहिती नाही.


तिची आठवण मात्र नेहमी येत असते.

कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. परमेश्वर या जोड्या बांधतो अस म्हणतात ते खरं आहे 

मी मात्र नेहमीच तिचे आयुष्यात चांगले व्हावे, जेथे असेल त्या ठिकाणी सुखी असावी हीच अपॆक्षा ठेवली.

आयुष्यात सगळ्याच गोष्टी मिळत नसतात हे अगदी सत्य आहे आणि त्यामुळेच जे मिळत नाही त्याची उणीव काय असते याची जाणीव होते.

एक पूर्ण न झालेली ही प्रेमाची ही गोष्ट मात्र माझ्यासाठी नेहमी एक कहानी बनूनच राहिली.


प्रकाश फासाटे.

मोरोक्को.

212661913052





पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू