पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गाव माझे तुझे

एक गाव असावे माझे तुझे
नदी शेजारी...
असाव्यात मखमली सुखाच्या वाटा
कानी याव्यात असंख्य नदीच्या लाटा
नदीला थोडी चिटकून असावी झोपडी
कोवळा पारिजात असावा तिच्या शेजारी
एक गाव असावे माझे तुझे
नदी शेजारी...
जावा असा पक्ष्यांचा थवा घरावरूनी
तो थवा बघावा मी तुझा हात हाती धरुनी
मोरांचे रान असे फिक्कट दिसावे कुठेतरी
हरणांचा कळप असावा झोपडी शेजारी
एक गाव असावे माझे तुझे
नदी शेजारी...
रात्र होता यावे काजव्यांनी आपुल्या अंगणी
इकडे रातराणीने जावी झोपडी अगदी गंधुनी
झोपडीत असावे एक साधे सुखाचे देवघर
झोपताना असावा एक मंदवतीचा कंदील शेजारी
एक गाव असावे माझे तुझे
नदी शेजारी..
गरिबीची आपुली व्याख्या थोडी वेगळी असावी
एक फक्त डोरले तुज गळ्यात, तू तेजस्वी दिसावी
सुख व्याख्या शिकवेल आपल्याला ही नदी दररोज
नाही कुठलीही वजाबाकी अन नाही कुठली उधारी
एक गाव असावे माझे तुझे
नदी शेजारी..

वैभव कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू