पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक आगळे वेगळे व्हॅलेंटाईन

व्हॅलेंटाईन डे म्हटले की मनात, हृदयात आणि सोशल मीडियावर प्रेमाचं प्रतीक दाखवण्याचा सर्वांच  प्रयत्न असतो.

 

 प्रत्येक जण मनातले भाव आपापल्या लेखांमध्ये, चित्रामध्ये किंवा फोटो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज मला देखील व्हॅलेंटाईन डे वर पहिल्या वहिल्यांदा काही लिहावेसे वाटले त्यादृष्टीने केलेला हा माझा प्रयत्न.

 

माझे व्हॅलेंटाईन म्हणजे माझी आई , कै. बाबा आणि अर्थातच माझी पत्नी कारण यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात जणू रंगच नाहीत. 

 

पण आजचा हा माझा लेख माझ्या अशा पहिल्या प्रेमावर आहे जी गोष्ट सजीवच नाही, अचंभित झालात का ? तस अचंभित झाल्यास नवल नाहीच !!!!!!! 

 

सजीव वस्तूंवरच प्रेम करावं किंवा त्यावर प्रेम करूनच व्हॅलेंटाईन डे साजरा करावा असे कुठे लिहिले आहे. मनाचा ज्या गोष्टींशी संगम झाला किंवा मन ज्या गोष्टीत गुंतले (मग ते सजीव असलं किंवा निर्जीव) व्हॅलेंटाईन डे त्या बरोबर सुध्धा साजरा करता येतो.

 

खूपदा आपलं पहिलं प्रेम आपल्याला मनापासून आवडत असतं आणि घरच्यांचा बऱ्याचदा त्या प्रेमा करता विरोध असतो आणि खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी घरचे लोक त्या प्रेमाला मान्य करायला तयार होतात. अगदी चित्रपटात दाखवतात तसे. माझ्या प्रेमाची गोष्ट देखील अशीच काहीशी आहे.

 

लहानपणापासून चॉकलेटी रंगाच्या horlicks घातलेल्या दुधापेक्षा, पाणी , वाळलेल्या पानांची पावडर, साखर आणि दूध असं समीकरण असणाऱ्या आणि कोणतेही पाहुणे जरी आले की प्रथमच ज्याची विचारणा होते ते पेयच माझं Valentine आहे. 

 

आता आपणास लक्षात आलेच असेल की मी कोणाचा उल्लेख करत आहे, अहो माझं Valentine म्हणजेच चहा...

 

हे माझं व्हॅलेंटाईन जरी निर्जीव असलं तरी एखाद्या सजीवामध्ये जणू तरतरी आणणारे आहे. 

 

" अरे इतक्या लहान वयात चहा प्यायलास तर उंची वाढणार नाही, हाडं बळकट होणार नाही मग कसं होणार तुझे? " अशी प्रेमळ भीती दाखवत घरचे मला बऱ्याचदा माझ्या पहिल्या प्रेमा पासून लांब ठेवत.

 

हया घरच्यांच्या भीती दाखवण्या मुळे मला ह्या पहिल्या प्रेमा पासून जणू मला मुकावे लागे. लहानपणापासूनच मी अगदी आतुरतेने माझ्या पहिल्या प्रेमाची भेट घ्यायची वाट पाही.  

 

वर्षभर जणू मी हया माझ्या पहिल्या प्रेमाची भेट घेण्याची वाट पाही आणि अखेरीस कुठल्या लग्नकार्य किंवा समारंभासाठी जेव्हा मी मुंबईहून माझ्या मूळ गावी इंदूर येथे जाई, तेव्हा माझ्या आई-वडिलांची नजर चुकवून मी माझ्या पहिल्या प्रेमाची मनसोक्त भेट घेई,  मग काय दोन-तीन काय चार कप काय, चहा पिण्याचा कुठेही काही मापच नसे

 

 या माझ्या व्हॅलेंटाईन बद्घल हळूहळू घरी देखील समजू लागले आणि मी आठवी मध्ये आल्यावर तर माझ्या भावंडांनी चक्क मला चहा पिणाऱ्या मुलाचा एक पुतळाच गिफ्ट केला. हळू हळू चहाचं आणि माझं नातं जणू अमर प्रेम मध्ये रूपांतरित झालं

 

चहाला काही वेळ नसतो परंतु चहासाठी वेळ काढायचा असतो असे समीकरण जणू मी सोडवू लागलो.

 

आज सुद्धा रात्री झोपायच्या आधी देखील कोणी मला चहा करता विचारणा केल्यास मी नकार देत नाही. माझं लग्न झाल्यावर माझ्या पत्नीस माझी ही सवय थोडी वेगळी वाटे, परंतु माझं व्हॅलेंटाईन तिच्या लक्षात आल्यावर, आता रात्री (मी विनंती केल्यास)  चहा देण्याची सवय तिच्या अंगवळणी पडल्यामुळे तिला विशेष कष्ट वाटत नाहीत. 

 

बऱ्याचदा,  झोपण्याच्या आधी स्वतःहून  चहा ठेऊ का ? अशी  प्रेमळ विचारपूस देखील ती करते आणि मी हो म्हटल्यावर,  माझ्या व्हॅलेंटाईन ची झोपायच्या आधी पण परत माझी भेट घडवते. 

 

माझे एक नातेवाईक बरेचदा आवर्जून म्हणतात कि सवाष्णीला हळदी-कुंकू करता आणि पुरुषाला चहा करता कधी विचारणा करू नये कारण दोन्ही प्रश्नाचे उत्तर होकारार्थीच असते. 

 

माझ्या मूळ गावी इंदूरला किंवा माझ्या आवडत्या शहरी कोल्हापूरला गेलो की या माझ्या व्हॅलेंटाईन मध्ये इतकी साखर घोळलेली असते ती माझ्या वेलेंटाइन चा गोडवा अजूनच वाढतो आणि मला त्या व्हॅलेंटाइनला भेटण्याचा आनंद द्विगुणीत करून जातो.

 

अशा या माझ्या निर्जीव पण सजीवांना तरतरी देणार्या व्हॅलेंटाईनला, आणि अर्थातच माझ्या वाचकांना व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा.

 

अमेय पद्माकर कस्तुरे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू