पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्हॅलेंटाईन डे

*व्हॅलेंटाईन डे*

 

आज व्हॅलेंटाईन डे 

जन्मल्यापासून तुझाच ध्यास होता. तूझ्या 

साठीच माझा श्वास होता. जागेपणीच नव्हे तर स्वप्नात देखील तूझ्या शिवाय कोणालाही पाहिले नव्हते. तू---तू आणि फक्त तूच 

आणि माझे स्वप्न साकार झाले. एकविसाव्या वर्षी तू मला ती संधी दिलीस. आता दिवस रात्र मी स्वतःला तुझ्या सेवेसाठी तैनात ठेवू शकत होतो.

सतत तुला डोळ्यात साठवू शकत होतो. 

 मी फक्त तुझा आणि तुझा आणि तुझाच आहे ग. दरवर्षी व्हॅलेंटाईन डे ला मी तुला पत्र लिहितो. माझ्या मनातलं मनोगत व्यक्त करतो. पण ते पत्र मी कधीच पोस्ट करत नाही. 

आज देखील मी तेच करणार आहे. माहित नाही, मला पूर्णपणे व्यक्त होता येईल की नाही ते----

  प्रेमाचा रंग गुलाबी असतो म्हणतात. पण मी आज रक्ताच्या लाल रंगाने हे पत्र लिहितोय. खूप छान मूड मध्ये होतो. तुला मस्तपैकी हसते खेळते पत्र लिहिणार होतो. पण--  पण - - - - - 

"साले ते हरामखोर, पंधरा जण होते. तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघत होते.तुझा अपमान करत होते. माझ्यासमोर तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत? आयुष्यात कधीही तुझा अपमान सहन करणे मला शक्य नव्हते. कितीही झाले तरी मी वाघिणीचा बच्चा आहे.   तुटून पडलो त्यांच्यावर आणि सगळ्यांना यमसदनी पाठवले. 

पण,पण शेवटी एका गोळीने घात केला. ती गोळी थेट माझ्या हृदयातच घुसली आहे, असु दे. ते ह्दय तुलाच दिले होते. ते तुझ्याचसाठी समर्पित झाले. प्रेमाची परिणिती या पेक्षा अधिक उच्च काय असू शकेल?  

असो, आता जास्त लिहिता येत नाही. शेवटचा श्वास लागलाय. तो बोलवतो आहे. जाताना एवढेच म्हणेन  की *याच जन्मी न्हवे तर जन्मोजन्मी तुझाच सुपुत्र म्हणून तुझ्या कुशीत जन्म घ्यावा. हे भारत माते . प्रत्येक जन्मात तुझ्याच साठी तुझ्याच कुशीत वीर मरण यावे*. हॅप्पी व्हॅलेन्टाईन्स डे आई 

तुझा भाग्यवान पुत्र 

वीरगती प्राप्त सैनिक. 

जय हिंद 

*© नितीन मनोहर प्रधान* 

*रोहा रायगड* 

14 फेब्रुवारी 2022 

 

*जमाने भर में मिलते है आशिक कई,*

*मगर वतन से खुबसुरत कोई सनम नहीं,*

*नोटो में भी लिपटकर*,

*सोने मे सिमटकर मरे है कई*

*मगर तिरंगे से खुबसुरत कोई कफन नहीं*

*(भगत सिंग)*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू