पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझं मागणं संपत नाही आणि तुझं देणं !

अंबाबाई, हे हार तुरे सत्कार पुरस्कार
तुझ्यामुळे, तूच एक मुक्तहस्त दातार

पूर्वजांची पुण्याई करते पुष्पवृष्टी
अमृताच्या धारा, तत्त्वांच्या संगोष्ठी

सृष्टीतील एकेक कण करतो सहकार्य
तेव्हा कुठे साकारते एखादे सत्कार्य

ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ आप्त मित्र कुटुंब
स्नेहाचा कलश नेहमीच असे तुडुंब

एवढं दिलंस जगदंबे, त्याची मोजदाद नाही
नित्य तुझे स्मरणी मी, तुला उपमाच नाही

माझं मागणं संपत नाही आणि तुझं देणं
तू नेहमीच देतेस आई, येन केन प्रकारेण

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू