पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

छत्रपती शिवराय

छत्रपती शिवराय तुम्ही राजे आगळेवेगळे
होते तुमच्या साथीला सच्चेे मावळे
देऊनी प्रजेला तुुम्ही सवलत
केलं त्यांना कायमस्वरूपी उन्नत
तेेज तुमचे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या कीर्तीचा कधीही होणार नाही अस्त
प्रजेला नेहमीच राही तुमचा आधार 
नाही सोडलं त्यांंना कधी निराधार
मां जिजाऊने केेली तुम्हासमोर हिंदवी स्वराज्याची कामना
तुम्ही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केली त्याची स्थापना
तुमच्या पराक्रमाची प्रेरणा अजूनही ताजी
सर्व राजांमध्ये अप्रतिम तुमची बाजी
उलथून टाकली तुम्ही मोगलांची राजवट
वाढवूनी आपला वट
होते तुम्हाकडे गुण असामान्य 
नैतिकता फक्त तुम्हा मान्य
शाहिस्तेखानाची बोटे कापून उडवली धांदल
घडवली त्याला जन्माची अद्दल
अफजल खानाचा वाघनखे वापरून बाहेर काढला तुम्ही कोथळा
इतिहासात प्रमुख आहे हा मथळा
बाजीप्रभूने तुम्हाखातीर लढवली घोडखिंड 
त्यांच्या बलिदानामुळेच तुम्ही केलं नामकरण 'पावनखिंड'
खरंच खूप महान होता तुमच्या मावळ्यांचा पिंड 
तुम्हाखातीर तानाजी मालुसरेनं केलं कोंडाणा सर 
नाही ठेवली आपल्या प्राणाचीसुद्धा कसर
म्हणून केलं तुम्ही कोंडाण्याचं 'सिंहगड' असं नामकरण
अशा या छत्रपती शिवरायांना आजन्म करतो मी कोटी कोटी नमन
©®-विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती, अणदूर
ता.तुळजापूर
भ्रमणध्वनी-9326807480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू