राजा शिवछत्रपती
#राजा_शिवछत्रपती
शिवछत्रपती
राजा रयतेचा
प्राण हा आमचा
मराठ्यांचा ||१||
स्वराज्य निर्मिले
बंधनी सोडले
लयास लाविले
मुघलांना ||२||
एकच तो जगी
झाला नृपती
शिवछत्रपती
जिजाऊंचा ||३||
जय जय जय
गर्जा जयकार
शिवबा हा थोर
वीर राजा
अरविंद कुलकर्णी