पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्य संजीवले (शार्दूलविक्रीडित)

आयुष्य संजीवले (शार्दूलविक्रीडित)
© चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

श्रीखोलेश्वरमंदिरात सखये, पूर्वी जरी भेटलो
स्नेहां ते मन-मंदिरात सखये, पत्रां सवे रक्षिले
ओंकारेश्वरमंदिरात सखये, ग्रीष्मातपी भेटलो
श्रीदेवी करिता कृपा बहु सखे, आयुष्य संजीवले

चित्तस्था मम मानसी सतत जी, आली पहा जीवनी
शोभे ती नभ चांदणी शशिसवे, झाली गृहस्वामिनी
कृष्णाची प्रिय राधिका विलसते, वृन्दावनी जीवनी
चंद्राची प्रिय मानसी विहरते, तैसे मनी जीवनी

श्रीदेवी समरांगणी सतत ती, पाठी उभी राहते
विद्यारत्न पदास हास स्मरतो, त्यांची कृपा मागतो.
दूरीकृत्य विकल्प ते सकल ही, संकल्प साकार ते
ऐसेची मम अंगणी घडतसे, शंका नुरे हे खरे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू