पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वर्गलोकीची यक्षकन्या

**स्वर्गलोकीची यक्षकन्यका**

****************************
( ** लता मंगेशकर **)

स्वर्गलोकीची यक्षकन्यका भूवर अवतरली
मंगेशाच्या कृपाप्रसादे स्वरराज्ञी झाली ll

सप्तसुरांच्या हिंदोळ्यावर
नादब्रम्ह डोले
इंद्रधनूच्या रंगामधले
रंग धुंद झाले
दिव्य स्वरातिल मधू प्राशण्या
उषा इथे थांबली ll

चिरतरूण त्या दिव्यस्वरांना
दिव्य पंख आले
दहा दिशांना भेदुन ते स्वर
ब्रम्हांडी फाकले
कालदेवता भान विसरुनी
स्वये इथे थांबली ll

स्वरकुसुमांच्या दरवळयोगे
आसमंत भारले
वसुंधराही म्हणे माझिये भाग्य धन्य झाले
अमृतस्वर ते प्राशन करुनी
धरा तृप्त झाली ll

कवी..अनिल शेंडे .
गानसम्राज्ञी लतादीदींचे आपल्यावरील उपकार कधीही न फिटणारे आहेत। लतादीदी अमर आहेत। त्यांचा स्वर अजरामर आहे ।
आदरणीय लतादिदींना विनम्र श्रद्धांजली ।

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू