पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गानसम्राज्ञी

गानसम्राज्ञी

 

सप्त सूरही गहिवरले

अश्रूंचा पूर ह्या नयनात

गानसम्राज्ञी ही निघाली

आज स्वर्गीय मैफीलीत..... 

 

तुझे जाणे सामान्य नाही

हा युगा युगाचा अंत

सूरांनीही मांडला असेल

आज एकच आकांत.... 

 

मंगेशाच्या गाभाऱ्यात

हुंदका होई अनावर

पुन्हा लता जन्मने नाही

आता भारत भूमीवर.... 

 

सांत्वणाला शब्द नाही

गहिवरले शब्द बिचारे

नेहमी तुझ्या दिमतीला

आज मुके झाले सारे.... 

 

आसमंत हंबरडा फोडी

बघून तुझी शांतावली काया

सुनी सुनी मैफील जाहली

येना पुन्हा सूरांकित कराया.... 

 

सौ. अलका माईणकर

अकोला

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू