पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आम्ही

आम्ही...

घरी जायचे पुन्हा एकदा विसरलोय आम्ही

दारी जायचे पुन्हा एकदा विसरलोय आम्ही


मायभूमीत जन्म घेतलाय, या मातीचे आम्ही

मातीचे ऋण फेडण्या, लढतोय आम्ही

देशाचा अभिमान राखण्या, घेतलाय हाती तिरंगा आम्ही

हिमालयाच्या उंच रांगेतून, आवाज ऐकतोय आम्ही


सह्याद्रीच्या कडेकपारीतून, स्वातंत्रतेचे गीत गातोय आम्ही

त्यागिला सदैव सुखसंसार, देशरक्षणार्थ आम्ही

छातीवरती गोळ्या झेलतो, जागतो स्वातंत्रतेसाठी आम्ही

भूदल, वायू, नौदलाचे, रक्षक होऊनि आम्ही

हातात प्राण ओठात गातो, गाणं भारतमातेचं आम्ही.


पांडुरंग कोकुलवार

नांदेड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू