पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

साथ

          

    

       साथ...

ना किनारा, ना अंत, लागला कधी 

रोजचेच जगणे मरणे आता

ना,कळले कधी


तुझी माझी साथ ना तुटली कधी

सात जन्माची गाठ ना,सुटणार कधी

रोजचेच जगणे मरणे आता

ना,कळले कधी

ना किनारा, ना अंत, लागला कधी 


नदिसारखे वहात इथपर्यंत आलो कधी

खळखळ खळखळ मंजुळ गाणी, गालो कधी

रोजचेच जगणे मरणे आता

ना,कळले कधी

ना किनारा, ना अंत, लागला कधी 


वाऱ्यासंगे झुळूक होऊनी साथ दोघांची कधी

निसर्गातील सुगंधाचा श्वास सोबत, जपलाय कधी

रोजचेच जगणे मरणे आता

ना,कळले कधी

ना किनारा, ना अंत, लागला कधी 


माहीत नाही अजून किती हे असेच चालायचे कधी

आयुष्याच्या सोबत्यांची काठी कुणाची,निसटेल कधी

रोजचेच जगणे मरणे आता

ना,कळले कधी

ना किनारा, ना अंत, लागला कधी 


कवी

पांडुरंग कोकुलवार

नांदेड


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू