पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रम

     

      श्रम....

रोग्याची सेवा कर, ते तुला आशीर्वाद देतील

प्राणी, पशु राखण कर, ते तुला दूध भाकरी देतील

पक्षांना दाना, पाणी कर, ते तुझी करमणूक करतील


झाडे लाव, वृक्ष मित्र हो, ते तुला थंड सावली देतील

झाड लाव तू सावली खाशील, आणि 

तुझे नातू पणतू गोड फळे खातील

कष्ठाची भाकरी खावी, फुकटचे खाऊ नकोस, अन कुणाच्या 

भरवश्यावर कधी तू राहू नकोस


थेंबे थेंबे तळे साचे संचय कर,उपाशीपोटी राहु नकोस

घामाच्या थेंबातले मोती कधीच वाया जात नाहीत पण 

श्रम करायला कधी तू विसरू नकोस

नवस करू नको पण अंधश्रद्धाही पाळू नकोस


अंथरून पाहून पाय पसरावे पण वीतभर लाकूड अन हातभार 

धिपली काढू नकोस

नाही जमले दानधर्म तर अति तिथे माती करू नकोस

केल्याने होते रे केलेची, पाहिजे मंत्र कधी तू सोडू नकोस


खोटनाटं बोलू नको, कर्ज कधी तू काढू नकोस 

सत्याची कास धर, असत्याला थारा देऊ नकोस

बुडत्याला काडीचा आधार दे,अविश्वास तू करू नकोस

एकीचे बळ दाखवून दे, मनी अहंकार धरू नकोस 

देश समृध्द कराया उठ, हात पाय गाळून बसू नकोस


पांडुरंग कोकुलवार

नांदेड




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू