पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवन

       जीवन...

पुर्वी अंत्ययात्रा दिसली की

मन गहिवरून जायचे

रडणारे चेहरे पाहून डोळे भरून यायचे

स्मशानात घेवून जायला मोठी अंत्ययात्रा निघायची पाठीमागे खुपच 

खूप गर्दी दिसायची

आता अंतविधी नाही की अंत्ययात्रा नाही 

कसली गर्दी न कसलेही दर्दी  नसते

घरी न आणता प्रेताची परस्पर विल्हेवाट असते

प्रत्येकाला भिती वाटे जवळसुध्दा कोणी जात नसते 

जिवाभावाच्या माणसाला शेवटचंही बघता येत नसते

गुळाजवळ फिरणाऱ्या मुंग्याही गेल्यावर सोबत नसतात

खांदा देणारे मात्र PPE किटमध्ये असतात

रोजचे मरण पाहून पाहून मनही मरून गेले

डोळ्यातले अश्रु आवरता आवरता आटून गेले

श्रीमंत, गरीब जात पात कसलाच भेदभाव न करता

सर्वांना एकाच गाडीत मात्र अलगअलग जाळतात माणसाची राख

होताना निशब्द होवून बघतात

खरंच माणसाचं जगणं शुन्य झाल आहे ?

त्याच्या मरणालाही किंमत राहीली नाही

मरण हेच अंतिम सत्य आहे

तेव्हा पिंडाला स्पर्श करायला

कावळेही कुठे राहीले आहे.

थाटमाट, शानो, शौकत

सारं काही ठिकाणावर असते काहीच नेत नाही 

कितीही कमवले तरी आपलं काहीच ऱ्हात नाही

माझं माझं म्हणता ईथे कोणाचं काहीच नसतं

जे डोळ्यांना दिसतं ते सार सारं खोट असतं

कितीही राजेशाहीत जगलात तरी

एकदिवसीस मातीला मिळते

साली जिंदगी काय असते ? ते मरताना कळते

आपल काय होईल ? हे आपल्यालाच माहीत नसतं

तेव्हा कसली काळजी आणि कसली चिंता

स्वस्थ आणि मस्त जगायचं आपण

आपल्या आयुष्याचा खेळ मांडून

जीवन आपणच आपण जिंकायचं असतं

जीवन....

पांडुरंग कोकुलवार

नांदेड


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू