पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बोकोबा

एक आगंतुक पाहुणा घरात शिरला

आईची उडाली धांदल कसं सांभाळू याला?

काय देऊ त्याला खायला?

कुठे देऊ त्याला जागा झोपायला?

ताई-दादा नाचती पाहुण्याभोवती

पाहुणा बिचारा गांगरून उभा जागेवरती

पाहुण्याला आंजारले, गोंजारले

त्याच्या मानेभोवती हळूच मुलांनी कुरवाळले

थोड्याच वेळात तो झाला भलताच लाडोबा

चढून बसला ताईच्या खांद्यावर नाव त्याचे बोकोबा

आईनेही मग केली त्याची सरबराई

गरम गरम दूध वर घातली मलई

खाऊन-पिऊन बोकोबा झाले सुस्त

त्यांनी लगेच गादीवर ताणून दिली मस्त


सौ. शिल्पा पराग कुलकर्णी

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू