पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

वसंत पंचमी

**वसंत पंचमी**

{शब्दांकन ~ज्योती अलोणे}  

                   
अंगावर गर्द जांभळ्या रंगाची  नवीकोरी साडी  , केसांत  माळलेला गजरा, कपाळावर चंद्रकोर, आणि तोडावर मँचीग मास्क लावुन असलेल्या पद्मजाने सेफ्टीडोअरच्या लोखंडीजाळीतुन आत बघत विद्दाताईंना विचारले…
       काकू, प्रज्ञा आहे ना घरी तिला जरा बोलवता का?
         आवाज ऐकून ,सोफ्यावर बसलेल्या विद्दाताई ऊठत म्हणाल्या,  अगं ये ना !  तुझीच वाटच बघतेय मी, ऋतुजानी सांगितलयं  यावर्षी तु  घरी येऊन संक्रांतीच वाण  देणार आहेस ते,कल्पना आवडली मला तुझी!
            पायातली चप्पल दाराबाहेर काढुन दारातुनच  पद्मजा म्हणाली...
   हो ना हो काकु! , मागल्या वर्षी आलेल्या कोविडच्या साथीमुळे बाहेर निघालो नाही आणि या वर्षी  ऐन संक्रांतीच्या वेळेला "तापाच्या साथीच" थैमान सुरू होतं, संक्रातीचा सण करून वाणं वाटायला जमलं नाही, आता बाहेरच  " ते"वातावरण थोडं निवळु  लागलंय. आज वसंत पंचमी आहे ना माझ्या सासुबाई म्हणाल्या,  निदान आज तरी पाच मैत्रीणिंना वाणाला बोलावं.  पण मला दुपारून  माझ्या आईकडे जायचंय. रथसप्तमीला करावं म्हटलंतर पुन्हा  त्या दिवशी माझं ऑफिस  आहे, त्यादिवशीही जमणार नाही. तेव्हा वेळे अभावी मीच ठरवलं घरी कुणी येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपणच त्यांच्या घरी जाऊन वाणं देऊन यावं म्हणजे आईकडे लवकर निघता येईल… माझ्या जवळच्या पाच मैत्रीणिंची परवानगी घेऊनच मी त्यांच्याकडे आलेली.. 
 कुठंय प्रज्ञा, मी फोन केलेला तीला मी येणाऱ म्हणुन….
      अगं ये दारातच काय ऊभी आहेस!
             नको काकु ,तुम्ही सिनियर सिटीझन आहात सध्याचं वातावरणात बघता जरा लांबच रहाते तुमच्या .जरा बोलवता का प्रज्ञाला ?
          अगं थोडावेळापुर्वीच प्रज्ञा  काही अर्जंट कामासाठी बाहेर गेलीय ,येईलच ईतक्यात  तु बैस आरामात..
            काकु  आजतरी आरामात  बसुन वाट बघणं  जमणार हो मला, ऊशीर होतोय! चार जणींना वाण देऊन झालयं , ही पाचवी प्रज्ञा ,पण ती घरी नाही म्हणता ,आता वेळेवर कुणाकडे जाऊ मी वाण द्दायला ?

            पद्मजा विचारात पडलेली दिसताच विद्दाताई म्हणाल्या…. अगं अशी पँनिक होऊ नकोस ,बैस जरा वेळ तिथे त्या पलीकडल्या खुर्चीवर प्रज्ञा येईपर्यंत ,तु तसं सांगितलयं न तीला मग येईलच ती लवकर घरी, तोपर्यत मी तुला माझ्या लहाणपणीचा  एक किस्सा सांगते ! 
               आनलेलं वाण देण्यासाठी प्रज्ञा ची वाट बघणं अनिवार्य होतं म्हणून पद्मजा खुर्चीवर बसली. 
                    अगं आम्ही लहान असतांना  आम्हाला संक्रांतीच्या दिवशी आपल्या आईसारखं वाणं  वाटण्याची भारी हौस  असायची. आम्ही  मुली या  दिवशी आमच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन त्यांना वाणं देऊन यायचो . बाकी मोठ्या बायकांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम दुपारून व्हायचा…मी पाच सहा वर्षाची असेन तेव्हा , संक्रांतीच्या दिवशी  मी नवीन परकरपोलकं घालुन, दोन वेण्या त्यावर घरीच तयार केलेला कुंदाचा गजरा लावून  तयार झाले.  एका तबकात हळदीकुंकवाची  कुयरी ,ऐकावाटीत तिळगुळ व दुसऱ्या  वाटीत हलवा आणि  ओटीसाठी बोरं ,ऊसाचे कांडके,हरभऱ्याच्या गाठी ,भुईभुगाच्या शेंगा  घेतल्या..वाणात द्दायला *लव्ह ईन टोकीओ*म्हणजे आताचे केसांना लावायचे "बो" घेतले .तबकावर पांढऱ्याशुभ्र क्रोशीयाच्या धाग्यामध्ये  केशरी लाल, गुलाबाची फुलं व हिरवी पानं  टाकून घरी विणलेला  रूमाल झाकला आणि  ते घेऊन वाण द्दायला घराजवळच्या मैत्रिणीकडे गेले…
       "अगं वंदना मी आलेयं वाण घेऊन.."
                वंदनाही नटून-थटून तयार होतीच.
तिला पाटावर बसवुन हळदी कुंकू लावले,हातावर तीळगुळ देऊन  "वाण"दिले.
आम्हा दोघींच्याही चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. संक्रांतीच्या दिवशी वाण देण्याचं महत्त्व काय असतं तेव्हा एवढं कळत नव्हतं, पण आपण आपल्या मैत्रिणीला काहीतरी गिफ्ट देतो आहे याचं कौतुक वाटत असायचं .वाणं देऊन झालं ,तिची आई हसुन म्हणाली,                          "वाण दिलसं ना मग आता ऊखाण्यात नावही घ्यायला लागतं बरं " 
         मी थोडी लाजले आणि तेव्हाचं प्रचलित  असलेला ऊखाणा घेतला.
                "इंग्लंड अमेरिका, मी आहे कुमारिका
 मला नाव विचारू नका"
 तशी वंदनाची आई म्हणाली वा गं वा !मस्त  नाव घेतलसं.                                               आणि आम्ही तिघीही हसलो ,मी त्या काकुंच्या पाया पडून ,तबक हातात घेऊन निघाले..
        वंदनाने विचारले तू सुरेखा कडे चालली आहेस का ? थांब मीही येते तुझ्याबरोबर आणि तिनेही आपलं तबक ऊचललं.  आम्ही दोघी मिळून आमची तिसरी मैत्रीण सुरेखाकडे निघालो. रस्त्याने जाता जाता एकमेकींनी घातलेल्या नवीन परकर पोलक्याच कौतुकही  सुरु होतं..

वंदे!  तुझ्या परकर-पोलक्याचा रंग छान दिसतोय शोभून दिसते तुला गुलबक्षी कलर...

हो  आजीने शिवलाय माझ्या आणि तुझा  हळदी कलर मस्त  दिसत आहे तुला!
बोलता बोलता आम्ही सुरेखाच्या घरी येऊन पोहोचलो.  सुरेखा घरी नव्हती.. तीची आजी म्हणाली..
  हमारी गुडिया घर पर नही है , आ जाओ अंदर बैठो .त्यांनी आपल्या सुनेला आवाज दिला ..    अरे बहु ऐक पीडा लेके आना तो..
आणि आम्हाला म्हणाल्या...वाण देने आई हो, आज संक्रातीके पवित्रपर्वपर कीसीको दान देना अच्छा कार्य है … हमारी गुडीया घर पर नही है लेकीन ऊसके नामसे  ईस पीडेको कुमकुम लगाओ, तिलगुड रख दो,और दानमे जो देना चाहती हो  वो पीडेपर  रख दो।

  मला त्यांची गोष्ट पटली, शेवटी आपल्या भावना महत्वाच्या.आम्ही त्यांनी सांगितलं तसचं केल… सुरेखाच्या  आजीच्या आणि आईच्या पाया पडुन आम्ही  पुढच्या मैत्रीणीकडे निघालो...
                              प्रत्येक संक्रांतीच्या वेळी  मला  माझ्या त्या अनोख्या पद्दतीने "वाण" नव्हे दान देण्याच्या प्रसंगाची आठवण येते आणि ऊपाय सुचविणाऱ्या त्या  आजीची सुद्धा…खरंच रम्य ते बालपणं...

 ते ऐकून पद्मजाच्या मनाची चलबिचल होऊ लागली. ती म्हणाली काकु, प्रज्ञा येण्याला कीती वेळ लागेल माहीती नाही…
      तीच्या बोलण्यातला आशय लक्षात येऊन विद्दाताई म्हणाल्या…. अगं आता पाट तर नसणार, पण तो टीपॉय आहे बघ तिथे…
 अगं, ऐखाद्या  वेळप्रसंगी काही गोष्टी आपल्या मनासारख्या साध्य होतांना दिसत नाही ,अशावेळी  गोंधळून न जाता थोडा विचार करून आपण त्यावर उपाय शोधू शकतो ,फक्त ईच्छाशक्ती कायम असायला हवी. 
पद्मजा ने त्यांच्याकडे बघून ऐक स्मित केलं ,ती जागेवरून ऊठली, हातात तबक घेतलं आणि ती टिपॉय कडे वळली...
           "जिवनाच्या प्रत्यक्ष अनुभवांचा सार..
**ज्योतिर्मयी**फेसबुक पेज फॉलो करावे.."
*******************************************

 

 

                                      

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू