पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंग माझा वेगळा

शॉपीजन स्पर्धेसाठी लेख

विषय रंग माझा वेगळा

 

रंगात रंगूनी सगळ्या

रंग माझा वेगळा......

हे वाक्य आठवले. आणि बालपणापासूनचे रंगाचे आकर्षण आठवले. इंद्रधनुष्याचे रंग आठवले. तानापिहीजा.... असे शब्द आठवले. तांबडा, निळा, पिवळा, हिरवा, जांभळा या रंगांशिवाय जगाची कल्पना करता येऊ शकत नाही. साडीचा शिवलेला ड्रेस आठवला. आजीच्या लुगड्याची गोधडी, त्यातील रंगबिरंगी ठिगळ आठवले. मला आकाशाचा निळा रंग खूप आवडतो. आकाशाचे पाण्यातील प्रतिबिंब विलोभणीय असते. देवदास चित्रपटातील पारो आणि चंद्रमुखीची साडी आवडली. आहारात भाज्यांच्या रंगांपेक्षा जीवनसत्वाला अधिक महत्व असते असे आजी नेहमी सांगते. मुले मात्र तिला चिडवतात आणि पिझ्झा, बर्गर, नुडल्सचे रंग दाखवतात. प्रत्येक रंगाची वेगवेगळी छटा असते‌. मला किचनमध्ये खाण्याचे रंग अजिबात आवडत नाही. उदाहरणादाखल बिर्याणीत टाकण्याचा रंग, शिरा बनवितांना वापरला जाणारा रंग इतकेच काय मैन्गो बोटलमधील आंबा रसाचा कृत्रिम रंग देखील आवडत नाही.

काही लोक निवडणूकीच्या काळात सरड्यासारखे रंग बदलतात. असे सहज बोलले जाते. कधी साधूसंत तर कधी डाकू अशा मानवी प्रतिमा समाजात दिसून येतात. अशा वेळी कथनी आणि करणी मध्ये तफावत दिसून येते. वागणे वेगळे आणि बोलणे वेगळे यापेक्षा प्रत्यक्ष कृती वेगळी असे विविध रूपरंगाचे स्वभावाचे दर्शन समाजात घडत असते. विशेषत:मुले आईच्या सहवासात सगळा हट्ट पुरवून घेतात हा नेहमीचाच अनुभव आहे. वडीलांसमोर मात्र अधिक बोलत नाही. हे चित्र प्रत्येक घरात दिसते. रंग म्हणजे प्रवृत्तीचेच प्रतिक आहे असे वाटते.

गुलमोहर फुलांचा रंग डोळ्यांना सुखद गारवा देऊन जाणारा ठरतो. पाण्याला तर रंगच नसतो. 

पानी रे पानी तेरा रंग कैसा

जिसमे मिलाओ हो जाये वैसा

नदीचे गोड पाणी संजीवनी बनते. गावैगावी समृध्दी मिळते. याविपरित समूद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य नसते. मात्र रत्नाकराच्या उदरात माणिक, मोती, शंख, शिंपले  विविध रंगात विविध आकारात बघायला मिळतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव नारळ अर्पण करून सागराची पुजा करतात. विविध रंगाचे चविष्ट मासे याच सागरामुळे अनेकांचा उदरनिर्वाह बनतात. 

आजही पोत घे, मणी घे, सुया घे, वाळ मनगट घे, मुलाला विमान घे, फुगा घे असे बोलत बायका अनेक वस्तू विकतात. रंगबिरंगी मणी कुमारिका मुलींना आवडतात. रंगीत हिरव्या बांगड्या सवासिनींना आवडतात. लहान मुलाला रंगीत फुगे आवडतात. 

आपण कसे आहोत? आपला रंग कसा आहे? हे आरसा सांगतो. आपले अंतर्मन उजळविणारे विचार आपल्या चेहर्यावर तेजकांती निर्माण करतात. 

ऊस डोंगा परि रस नोव्हे डोंगा

काय भुललासि वरलिया रंगा

असे वर्णन संत साहित्यात केले आहे. 

माझ्या मुलाला छोटा भीमचे कार्टुन आवडते. डोरीमनचे चित्र काढायला आवडते. त्याला मी बोलले, " मोबाईल बघून झाला की वरणभात संपव".

तो पुष्पराज सिनेमा बघत होता. तो म्हणाला, "पुष्पा झुकेगा नही साला" मी रागावून म्हणाले, "जेवणाचा वेळ निघून गेल्यावर जेवण मिळणार नाही. पिवळ्या रंगाची डाळ आवडते ना तुला?"

मुलगा म्हणाला, "मम्मा तूच भरव ना मला, हे बघ मला अस शर्ट पाहिजे पुष्पा सारख, हा रंग आवडला मला"

मी त्याला मानेने होकार दिला. यापुर्वी बाहुबली सिनेमातली साडी त्या साडीचा रंग आवडला म्हणून त्याने माझ्यासाठी       ऑनलाईन साडी खरेदी केली होती. काल त्याने कच्चा बदाम गाण्यावर छान डान्स केला. त्याने मला विचारले, "बदामाचा रंग बदामी असतो ना मम्मा, तू एक बदामी रंगाची साडी घे" त्याचे वडील मुद्दाम चिडवित म्हणाले, "बदाम खाऊन अक्कल येते. बदामाच्या रंगाच्या साडीने काय अक्कल येणार?"

मुलगा म्हणाला, "माझी मम्मा हुशारच आहे. बदामी रंग तिच्याकडे नाही म्हणून मी बोललो. तिला सगळ्या रंगाच्या साड्या आवडतात‌." त्याचे वडील शांत बसले. 

त्याने ओरबीज म्हणून रंगीत खेळणी आणली. पाण्यात टाकली. थोड्या वेळाने ती खेळणी पाण्यात भिजुन मोठी झाली. मुलांनी काचेच्या भांड्यात ती खेळणी ठेवली. रंगच रंग जीवनात विखुरलेले असतात. कटू,गोड, तिखट, खारट अशा चवीप्रमाणे सुख दु:खाचे, उतारचढावाचे रंग मानवी जीवनात परिवर्तन घडविणारे ठरतात. या संदर्भात एक कविता आठवली.

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक......

सुंदरता शापित असते असे म्हणतात. कुरूपता श्रेष्ठ ठरते असा एक अनुभव एका कांदबंरीत मांडला गेला. काम, क्रोध, मोह, माया हे देखील विकारांचे रंग आहेत. लाल, पिवळा, भगवा हा सुर्योद्याचा रंग आकर्षक चित्तवेधक ठरतो. कमळ, गुलाब, झेंडू, चंपा, चमेली, मोगरा या फुलांचे रंग चित्तवेधक ठरतात‌. नव्या नवरीचा सुंदर गोरापान रंग आकर्षक ठरतो‌. नवरा मुलगा सावळा असला तरी त्याचे कर्तृत्व महत्वाचे मानले जाते. विविध ऋतूंचे रंग माणसाला आशावादी बनवतात‌‌. उदाहरण म्हणजे पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नदी नाले हिरवागार डोंगर संपुर्ण सृष्टी ओलीचिंब झालेली अशा वेळी सुंदर निर्सग पाहून कवी मनाला अनेक कल्पना सुचतात‌. वसंत ऋतूचे दर्शन देखील सुंदर असते. फळे, फुले, फुलपाखरे, हे सगळ मानवी प्रवृत्तीला शांत आणि संयमी बनविण्याचे धडे देत असतात. कोकीळाची कुहूकुहू असो कि बेडकाची भराव डराव किंवा पळसफुलांचा रंग सगळ मनमोहक आणि प्रेरणा देणारे आहे. 

मुलांना भाज्या अजिबात आवडत नाही. परंतू सलाद मात्र भरपूर खातात. कारण त्यात रंगबिरंगी भाज्यांसोबत दही, साखर घातलेली असते. मुलीला मोमोज आवडतात. मुलगा थालीपीठ आवडीने खातो‌. आवडनिवड वेगळी असली तरी रंगबिरंगी भाज्या विविध स्लरूपात शरीराला जीवनसत्व म्हणून मिळणे आवश्यक असते. शेवटी जे सुख समाधानात असते ते हजारो रूपये खर्च करून बाजारात विकत घेता येत नाही. 

पुन्हा एक कविता आठवली.

संत तुकडोजी महाराज म्हणतात,

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.

टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या आयुष्यात जे सुख आहे तेच सुख लेखकाच्या, त्याग करणार्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असते हा अनुभव दुनियादारीत मिळतो. शेवटी त्यागाचा देखील एक रंग असतो. अंध व्यक्तीच्या आयुष्यात रंग नसले तरी ते स्पर्श माध्यमातून ब्रेल लिपी शिकत चित्र काढु शकतात. या जाणिवा देखील जीवन सदाबहार करतात.

सुर्य, चंद्र, तारे, पक्षी, प्राणी हे सगळे विविध रंगाने सजले आहेत. मोर आकर्षक दिसतो.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा 

हवा, आई मला नेसव शालू नवा

या तारूण्यसुलभ भावना सहज निर्माण होतात. प्रत्येक रंग आशावादी आहे. प्रत्येक रंगाचे जीवनात स्वागत केले पाहिजे.

 

 

प्रज्ञा हंसराज बागुल

कसारा ठाणे

8080453480

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू