पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निळा

हा लेख लिहिताना काही भाग किंवा काही त्यामध्ये चुका आढळल्यास क्षमा असावी.हा लेख माहिती सांगण्याच्या उद्देशाने लिहीत असून याबद्दल लिहिण्यास विषय दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत आहे.
निळा हा रंग पाहताच आठवते ते पाणी, आकाश.निळा रंग हा खूपच सुंदर असून तो खूपच प्रभावित करतो.या रंगाला विविध नावाने ओळखले जाते. उदा.निळा,निळसर,निलवर्ण, निळकंठ इत्यादी. या रंगाला खूप महत्त्व आहे.
इतिहास पाहायला गेला तर या रंगाला काही पौराणिक कथांचा देखील समावेश आढळतो.या रंगाचे नाव निळकंठ हे असून हे महादेवाचे नाव आहे.त्याबद्दल सांगायचे झाल्यास थोडक्यात सांगता येईल ते असे की, फार पूर्वी समुद्रावर देव आणि असुर याच्या कडून समुद्र मंथन करावयाचे ठरले.आणि जी काही रत्ने येतील ती घेऊ असे ठरवले होते.त्याप्रमाणे मंथन सुरू झाले.पण सुरुवातीला त्यातून विष निघाले.या विषाने हाहाकार उडाला.त्यावेळी देव आणि असुर यांनी महादेवाचा धावा सुरू केला.भक्ताच्या हाकेला महादेव प्रसन्न झाले.त्यावेळी झालेला प्रकार आणि परिस्थिती महादेवास साऱ्यानी सांगितली.असे असताना भक्तांच्या रक्षणासाठी महादेवाने ते विष प्राशन केले.ते विष गळ्यात स्थिरावले.आणि कंठ निळा दिसू लागला.तेव्हापासून महादेवाचे नाव निळकंठ असे पडले.
निलम हे रत्न खूप अनमोल आहे.हे रत्न निळ्या रंगाचे असून याला खूप महत्त्व आहे.जोतिषशास्त्रानुसार हे निलम रत्न धारण केल्यानंतर शनीचा प्रभाव कमी होतो असे सांगितले जाते.याचप्रमाणे विष्णूचा सातवा अवतार भगवान राम हे असून या अवतारात या देवाने निळा रंग धारण केला होता.यामुळे या निळ्या रंगाचे महत्त्व आणखीन शोभून दिसते.
निळा रंग हा विविध ठिकाणी वापरलेला आढळतो.उदा.भारताचा झेंडा हा चार रंगाने रंगवलेला आहे.यामध्ये पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी अशोक चक्र असून तो निळ्या रंगाचा आहे.अशोक चक्र हे शांतीचे प्रतीक असून निळा रंग हा सुद्धा शांतीचा संदेश देणारा आहे.त्यामुळे हा रंग वेगवेगळ्या ठिकाणी शांतीचे प्रतीक रूप म्हणूनही वापरला जातो.हा रंग सगळीकडे पसरलेल्या स्थितीत दिसून येतो.आकाशात ,नदीमध्ये हाच रंग दिसून येतो.तसेच शाळा, चित्रकार याच्याकडे हा रंग असतोच असतो.यामधून तयार केलेल्या कलाकृती सगळीकडे प्रसिद्ध आहेत.हा रंग चांगला दिसत असल्याने तो वेगवेगळ्या कपड्यामधून शोभून दिसतो.आणि यावर केलेल्या कलाकृती सूंदर असून या रंगाला सर्व ठिकाणी मागणीही खूपच असते.
चित्रपट सृष्टी,नाटक मध्ये हा रंग मेकअप साठी वापरला जातो.या रंगमंचावर विविध प्रकारचे लाईट वापरल्या जातात.त्यात प्रामुख्याने निळा रंगाच्या लाईट खूपच आकर्षून घेत असल्यामुळे या रंगाच्या लाईटला खूपच मागणी आहे.चित्रपट सृष्टी मधील अनेक चित्रपटात निळ्या रंगाच्या नावाचा वापर सुद्दा आहे.उदा.ब्लु .तसेच निळया रंगाच्या कपड्यामधून अनेक कलाकारांनी काम केलेले आहेत.उदा.नाटक ज्यावेळी केली जातात त्यात वेशभूषा.
निळा रंग हा सामान्यपणे सगळीकडे असून काही झाडे पक्षी यांची नावे या रंगामुळे पडलेली आहेत.उदा.निलगिरी पर्वत ,निलगाय,ब्लु व्हेल.इत्यादी.नेपच्यून हा सूर्यमालेतील ग्रह असून तो पृथ्वीवरून दुर्बिणीतून पाहिल्यावर निळा दिसतो.आपली पृथ्वी जर दुसऱ्या ग्रहावरून पाहिल्यास निळसर दिसते.याचे कारण की,आपल्या पृथ्वीवर जास्त प्रमाणात पाणी आहे.हे पाणी समुद्र, महासागर,तलाव,नदया या स्वरूपात उपलब्ध आहे.
शहराच्या ठिकाणी फिरायला गेलात तर उंचच काचेच्या इमारती आढळतील या इमारती निळसर दिसतात.या इमारतीचा प्रामुख्याने वापर कार्यालयीन कामासाठी केला जातो.गावाच्या ठिकाणी फिरायला जात असाल तर गावामध्ये खूप उंच डोगर दऱ्या आहेत.यांचे दर्शन तुम्ही पहाटेचे कराल तर खूप शोभनिय असा हिरव्यागार वनराईतून निळसर रंगाचा सुंदर असा देखावा पाहायला मिळतो.यासाठीच काही पर्यटन स्थळ प्रसिद्ध आहेत.काही ठिकाणी समुद्राच्या तळाशी जाऊन रंगीत अशा विविध माशांना तेथील झाडांना पाहता येऊ शकते.यामध्येही विविध मासे हे निळ्या रंगाचे दिसतात.तो देखावा पाहतच राहावा यासाठी काहीजण या माशांना घरी सुद्दा घेऊन येतात.आणि फिशटॅन्क मध्ये ठेवतात.यामध्ये प्रामुख्याने निळ्या रंगाला विशेष पसंती आहे.भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर असून तो निळ्या रंगाचा असतो.ज्यावेळी पाऊस पडतो त्यानंतर काहीवेळेला ठिकाणी इंद्रधनुष्य दिसतो.हा देखावा फारच कमी प्रमाणात पहायला मिळतो. इंद्रधनुष्य याचे सात रंग असतात त्यामध्ये निळा हा रंग आढळतो.
सामान्यपणे आजच्या जगात निळा या रंगाच्या वस्तू सगळीकडे मिळतात.उदा.निळ्या रंगातील खुर्च्या ,टेबल,कागदी वस्तू अशा विविध ठिकाणी निळ्या रंगाचा वापर होताना दिसतो.तसेच रंगामध्ये सुद्दा निळा रंग हा होळीच्या सणाला खूप प्रमाणात वापरताना दिसतो.या रंगाचा वापर तुम्ही सुद्दा करा आणि होळीच्या या सणानिमित्ताने रंग उडवून आनंद घ्या.पण हा आनंद घेताना जपून घ्या.
रंगपंचमीच्या आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा..

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू