पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जागर स्त्री शक्तीचा

जागर स्त्री शक्तीचा


चला सयांनो चला, घेऊनी हात हाती

दाखवूयात सर्व जगाला, आपुली स्त्री शक्ती

सख्यांनो, आपण आहोत, सावित्रीच्या पाती

सर्वजणी मिळून पेटवू, ज्ञानाच्या ज्योती


पसरवू प्रकाश आपण, ज्ञानाचा या जगती

करूयात आपण सर्वजणी, सर्वांगीण उन्नती

मार्गात आपुल्या जरी, असंख्य खाचखळगे असती

नित्य नवी शोधून वाट, जाऊ आपण पुढती


हातात हात गुंफून,ओलांडू अन्यायाच्या भिंती

देऊ संकटा टक्कर,उगा का बाळगावी भिती?

वाटेवरील काचांची, का बाळगावी आपण क्षती?

ओलांडू काचा आपण, फुलवूनी अंगार चित्ती


समान अधिकारांची, जरूर करू प्राप्ती

सबला आहोत आपण,सार्थ करू ही उक्ती

पाळण्याची दोरी जरी, असे आपुल्या हाती

उद्धारू नारी वर्गाला , करून शिक्षणाची सक्ती


होऊनी सुविद्य आपण, जपू आपुली संस्कृती

भावी पिढीस शिकवू, सदाचार आणि सुनिती

सांगूनिया थोर व्यक्तिंच्या, कार्याची महती

घडवू सुसंस्कारित पिढी, या भूतलावरती


नित्य निरंतर करू , वाटचाल ध्येय पथावरती

दिगंत होईल कीर्ती,आपुली सयांनो या जगती

चला सयांनो चला, घेऊनी हात हाती

दाखवूयात सर्व जगाला, आपुली स्त्री शक्ती


©️®️ ऋजुता देशमुख 


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू