पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ती चा उंबरा

सहज सुचलं म्हणून.. थोडं विचार करण्यासारखे..????


घटस्फोटाच्या उंबरठ्यावर अनेक संसार थांबले आहेत..

असं अलीकडेच पेपर मध्ये वाचण्यात आले. माहेरचा उंबरा ओलांडताना मन किती कावरबावरं झालेलं असतं.. आणि सासरचा उंबरा स्वागत करण्यासाठी आतुर झालेला असतो. सासरचा तो उंबरा अनेक जणींना ओलांडता येत नाही कारण त्या नंतर स्वागत करण्यासाठी तिसरा उंबराच नसतो असं म्हणतात. अनेक गृहिणी तिसरा उंबरा न लाभल्यामुळे दुसऱ्या उंबरठ्याच्या आतच झिजून झिजून आता हेच आपलं आयुष्य मानून जगत असतात कारण माहेरी असताना माहेरच्या माणसांवर अवलंबून आणि सासरी असताना सासरच्या माणसांवर अवलंबून दोन्ही कडे म्हणतील तस जगणं आणि जर का चुकुनही एखाद्या स्त्री ने दुसरा उंबरा ओलांडला तर हा समाज तिला जगू ही देत नाही आणि मरु हि देत नाही.‌ पण आता असं राहिलं नाही आता तिने स्वतःचा असा भक्कम उंबरा निर्माण केला आहे.

खोटं वाटतं ना पण खरं आहे हे. तिच्या शिक्षणाने, तिच्या स्वाभिमानाने, तिच्यात असलेल्या जिद्दिने, तारेवरची कसरत करत जपलेल्या छंदाने, तिच्या स्वाभिमानाने, कुठल्याही परिस्थितीत बदल न करता जगणं आता तिने जमवून घेतलं आहे आणि अभिमानाने कुणावरही अवलंबून न राहता तिचा हा भंकम उंबरा तीच्या स्वागतासाठी नेहमीच सज्ज असतो‌. म्हणून मुलींनी शिक्षण घेऊन स्व:ताचा उंबरा तयार करावा आणि ज्यांना हे जमलं नाही, त्यानी नुसतंच घर आणि गोतावळ्यात अडकून न राहता थोडा स्व:ता साठी वेळ काढून  आपल्या आवडीनिवडी तरी जपाव्यात. आत्ता पर्यंत खूप जबाबदारी पेलत इथवर आलात.

कळतंय मला.

आत्तापर्यंत आपण आपल्या लहानपणापासून आई, आज्जी, मावशी, यांना पहात आलो आहोत अनुभवत आलो आहोत. स्त्रियांना कितीही वय झालं तरी कुणी अस म्हणणार नाही,कि तू आता बस,थोडी विश्रांती घे म्हणून. फार फार तर म्हणतील मुलांना सांभाळा, थोडा बसल्या बसल्या लसूण सोलून द्या,थोडी भाजी निवडून द्या.. वैगेरे वैगेरे. पुरुष मंडळी रिटायर होतात. स्त्रीयांच्या आयुष्यात रिटायर हा शब्दच नसतो.

मला एवढंच म्हणायचं आहे.

कितीही जबाबदारी आली, किती वय वाढलं, तरी हि एक स्त्री सारं काही छान पणे सांभाळते. तसंच तिने स्वता:साठी वेळ काढून आपले छंद जोपासावेत. तुमच्या साठी तुमच्या छंदाचा उंबरा तुमचं स्वागतच करेल.


आज जागतिक महिला दिनानिमित्त हा लेख  लिहिता आला.


तमाम महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.????


 सौ. प्रेरणा प्रभाकर हडवळे ????????????‍♀️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू