पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्त्री एक तेजस्विनी

स्त्री, एक तेजस्विनी
तिचा जन्म झाला त्यावेळी आकाशात लख्खकन वीज चमकली . पुरोहितांनी भाकित केले ,
"हिच्या कर्तृत्वाने ही जग उजळून टाकेल " .
कन्येच्या जन्माने आधीच आनंदित झालेले माता पिता अधिकच आनंदित झाले . त्यांनी तिचे नांव सौदामिनी (म्हणजे वीज)ठेवले .
सौदामिनी दिसामाशी वाढू लागले तसे तिचे तेजही वाढू लागले . तिचे तेजस्वी गुण दृग्गोचर होऊ लागले . नाव सार्थ होणार अशी लक्षणे स्पष्ट होऊ लागली .
वाचन वाढत गेले तसतशी अनेक कर्तबगार स्त्रियांशी ओळख होत गेली . प्रत्येकीचे चरित्र वाचताना ती मनाशी एकेक खूणगाठ बांधत होती.
' मी जिजाबाई बनेन, स्वतःच एक नवीन धर्म स्थापन करीन.
येसूबाई बनेन, धैर्याने शत्रूला तोंड देईन, शिवाजीचे नाव राखीन.
झाशीची राणी बनेन, बलाढय शत्रूला नामोहरम करीन
अहिल्याबाई बनेन, समाजकार्य करीन , तिच्यासारखा राज्य कारभार चालवीन.
पंडिता रमाबाई बनेन, ज्ञानाचा प्रसार करीन .
आनंदी जोशी बनेन , सातासमुद्रापार माझ्या देशाचे नाव उज्ज्वल करीन ..
प्रत्येक आदर्श स्त्रीमधून एकेक गुण ती मनात ठासवत होती.
थोडी मोठी झाल्यावर स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या ऐकून, तिच्या मनात एक स्फुल्लिंग चेतला .
नाही! नाही!
स्त्रीने कदापि
अबला होता कामा नये.
निसर्गानेच वीज आणि काळा ढग ह्यांचे एकत्र नाते निर्माण केले आहे. नियतीनेही तसेच केले . तिची जन्मगाठ एका काळ्या ढगाशी बांधली तो तिच्या तेजाने दिपून जात होता . त्याने वेळोवेळी तिचा अपमान, पाणउतारा केला. अपशब्द वापरून तिचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला . पण ती नमली नाही.
तिच्या मनातील स्फुल्लिंग सतत चेतलेला होता.
तिने दृढनिश्चय केला होता.
मी शब्द गिळेन , डोक्यावर बर्फ बांधीन , मौन स्वीकारेन पण सीता होणार नाही. रामायण घडू देणार नाही .
शब्द वापरीन पण अंधांचे डोळे उघडण्या साठी. महाभारत होऊ देणार नाही . द्रौपदी होणार नाही, मदतीसाठी कृष्णाचा धावा करणार नाही स्वयंसिद्धा बनीन .
एके दिवशी कोणतेही रामायण, महाभारत न होऊ देता तिने शांतपणे त्या काळ्या ढगाला दूर ढकलले .
एक नवे विश्व निर्माण केले. अनेक दालने पादाक्रांत केली, अनेक वादळांना खंबीरपणे तोंड देत प्रकाशत राहिली.
लहानपणीची सर्व ध्येये यशस्वीपणे पूर्ण करत राहिली.
आज सगळे जग तिच्या कर्तृत्वाने ,तेजाने स्तिमित झाले आहे. पुरुषांना मागे टाकून ती तेजाने चमकत आहे. सौदामिनी लख्ख प्रकाशाने डोळे दिपवणारी.


सुलभा गुप्ते
७ मार्च २०२१

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू