पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुझ्या माझ्या संसाराला

तुझ्या माझ्या संसाराला


तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं.

तुझ्यासाठी रे जगावं, तुझ्यासाठी रे मरावं.

तूझ्याविना नको नको, जगाचे ते सुख.

वात होऊनी दिव्याची,तुझ्यासाठी रे जळावं 


नाही तुझ्याविना, खरी संसाराला गोडी.

नाही उरला मोह,जुळलीआयुष्याची जोडी. 

तूच माझा खरा सखा, तूच माझ खरं मन 

संसाराच्या तिजोरीच सख्या , तूच खरं धन 


लाभली तूझी प्रीती, आयुष्याच झाल सोनं.

गुंतल तुझ्यात मन, नाही काही आता उण.

तूझी राहू दे साथ, असे प्राण माझ्या देही.

तुझ्यावीण हे जीवन, मला सरणार नाही..  


©®प्रकाश फासाटे.

       मोरोक्को.

  212 661913052




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू