पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

निळा रंग

निळा रंग


रंग आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवत असतात. माझा आवडता रंग निळा आहे निळ्या रंगाच्या विविध छटा मला लहानपणापासूनच मोहवतात. तस पहायला गेलं तर आपल्या सर्वांच्याच जीवनात रंगांचे खूप महत्व आहे.निळा ,हिरवा आणि लाल ह्या मूळ रंगांकडे आपण बालपणापासूनच जास्त आकर्षित होत असतो.
अगदी लहान असतांनाच आई आपल्याला सृष्टीतील विविधरंगांची ओळख करून देते
निळा रंग आकाशाचाआणि समुद्राचा,हिरवा रंग झाडांचा तर काळा रंग मातीचा वगैरे.
निळ्या रंगाच्या विविध छटांच्या वापराने वेगवेगळे अर्थ सूचित केले जातात.'ऐक्वा आणि आणि ऐक्वामरीन ही छटा पाण्यासाठी, तर गडद निळा (नेव्ही ब्ल्यू)रंग सागरी सैनिकांसाठी अझूर आणि सेरूलिअन हा आकाशासाठी (स्काय ब्ल्यू)तर कोबाल्ट ही छटा एका धातूसाठी दर्शवली जाते. रंगांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. वेगवेगळ्या देशात विविध संस्कृती, परंपरा, लोकश्रद्धा आणि लोकश्रुती यामध्ये सापडणारे रंगांचे संदर्भ प्राचीन साहित्यातील उल्लेख, आधुनिक विज्ञानाचा अभ्यास पाहिला तर आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते भूगोलात पृथ्वीचा रंग निळाच दर्शवला जातो. शीतलता,
पारदर्शकता आणि भव्यता हे निळ्या रंगाचे गणधर्म. निळ्या रंगाचे आकाश म्हणजे नजरेत न मावणारी व्यापकता.निळा रंग
जसा ज्ञानाचा प्रतीक मानला जातो त्याचबरोबर प्रसन्नता
शांतता,स्तब्धता आणि स्थिरता प्रदान करतो. निसर्गाच्या अलौकिक शक्तीचा परिचय, असीम आणि अमर्याद आकाशाच रंग अव्याहतपणे आपल्याला देत असतो. व्यापक आकाशाप्रमाणे विशाल सागर आणि बर्फ याचाही निळा रंग
प्रतीक मानला गेला आहे.
वैयक्तिक अथवा सामाजिक जीवनात आत्मसन्मान, प्रतिष्ठा, गौरव, परंपरांचा अभिमान या भावना निळ्या रंगातूनच व्यक्त
होतात. पौर्वात्य देशात निळा रंग (थायलंड,जपान कोरिया) उदास रंग मानला जातो. परंतु पाश्चिमात्य देशात मात्र उलट समजतात. तिकडे 'ब्ल्यूफैमिली, ब्ल्यू ब्लड,ब्ल्यू मून 'असे शब्द प्रचलित आहेत .ऑस्ट्रेलिया मध्ये 'ब्ल्यू माउंटन' प्रेक्षणीय स्थळ आहे.आपल्या देशाच्या तिरंगा ध्वजात अशोकचक्र निळ्या रंगाचेच आहे. तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,इंग्लंड या देशांच्या ध्वजात निळा रंग प्रमुख आहे.अनेक समाजसेवा करणा-या अंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थानी आपल्या परिचय चिन्हासाठी निळ्या रंगाचाच वापर केला आहे.उदाहरणार्थ-
बोईंग -hp-इंटेल,फोर्ड, फॉक्स वैगन,बी एम डब्ल्यू,डेल, फेसबुकचा F, डेल,सैमसंग सिमेन्स फिलीप्स आणि आयबीएम यांसारख्या सर्व अंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लोगो निळ्या रंगाचाच आहे आहे.नासा-नाटो-यूएन,यूनेस्को,यूनिसेफ,कौन्सिल ऑफ यूरोप ,यूरोपिअन यूनियन अशा संघटना निळा रंगच वापरतात. आपल्या भारतीय क्रिकेट टीमच्या(वन-डे)कपड्यांचा रंग पण निळाच आहे. ' टरक्वाइज,फिरोजा आणि
सफायर सारख्या मुल्यवान खड्यांच्या छटा निळ्याच आहेत.
काही प्राचीन आणि काही अत्याधुनिक संस्कृतीत सामाजिक जीवनात निळ्या रंगाच्या उपयोगाचे विविध संदर्भ आणि अर्थ पहायला मिळतात. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत आराध्य देव-देवता, राजे-राण्या यांच्या चित्रांमध्ये त्यांना निळे पंख दर्शवतात. ब्रिटेनमध्ये निळा रंग अधिकार दर्शवण्यासाठी
वापरतात पोलिसांचा गणवेश निळ्या रंगाचा होता.पारंपारिक विवाह समारंभात नववधू आपल्या पेहरावात छोट्या प्रमाणात निळ्या रंगाचा वापर आजही करतांना दिसतात. ख्रिश्चन धर्मात येशू ख्रिस्त ची आई मेरी नेहमी निळ्या रंगात दाखवली जाते. आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही देवाच्या प्रतिमा निळ्या रंगात चित्रीत केल्या जातात
जातात.फेंगशुई च्या अनुसार आपल्या आसपासच्या वातावरणात निळ्या रंगाचा प्रयोग केल्यास आपली इच्छापूर्ती होते.हलका निळा रंग सृजनशील लोकांकरता लाभदायक असतो. गडद निळ्या रंगाचा वापर झोपायच्या खोलीत केल्याने शांत झोप लागते. निळा रंग ब्लडप्रेशर पण नियंत्रित करतो.
वैज्ञानिकांच्या अनुसार निळा रंग भूक कमी करतो .म्हणून खाद्यपदार्थांवर निळ्या रंगाचा वापर करत नाही. संपूर्ण जगात निळ्या रंगाचे प्रमाण जास्त आहे.निळा रंग जलतत्वाचा प्रतिनिधी आहे .निळा रंग अध्यात्म आणि भाग्याशी पण संबंधीत आहे असे मानले जाते.
अशाप्रकारे भव्य आकाशाच्या रूपाने निळा रंग आपल्या दैनंदिन जीवनात प्रभावी आणि आश्वासक रूपात भरलेला आहे.


सौ ऐश्वर्या डगांवकर.
इंदूर मध्यप्रदेश.
9329736675.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू