पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंग माझा वेगळा

                          " रंग माझा वेगळा "

 

" काळं पिकतं तेव्हा सोनं उगतं " अशी माझी आई  मला नेहमी म्हणायची. " मला लहान असताना कळायचं नाही. मला माझी भावंडे काळ्या काळ्या चिडवत असे.मला सुचलेली कविता.

 

" रंग माझा काळा, ना आवडे कुणाला

पाहतो मी स्वतःला, दुःख दाखवीन्या आरशाला.

आरसा म्हणाला भुलू नकोस रे चेहऱ्याला,

दाखव प्रेमळ,माणुसकीचा रंग तु जगाला. "

 

 

असो मला मात्र माझा ' काळा ' सावळा रंग खूप आवडतो.

मला काळे- पांढरे कपडे मोठया कार्यक्रमात घालायला भारी आवडतात..

यशोदा माई चा कृष्ण, पार्वतीचा महादेव, 

रामाचा बंधू लक्ष्मण, 

आईच्या सांगण्यानुसार आपल्या लाडक्या विठु रायाचा

पांडुरंगा चा रंग काळा, त्याच्या मुळेच ही सृष्टी रोज पहाटे सप्त रंग घेऊन उजळून निघते. रात्री थकून भागून आपल्या काळ्या घट्ट छायेत शांत रात्री झोपवते. आणि पुन्हा नव चेतनेने ताजी तवानी ऊर्जा जगवते.

 

मला ही काळा रंगा चा सुंदर न दिसल्याचा द्वेष वाटे. पण जसे दिवस आणि रात्री. तसेच काळे - पांढरे रंगाचे आपल्या आयुष्यात अस्तित्व आहे हे मला जाणवले.

आज मी काळा रंग. कोणत्याही दृषकृत्याचा निषेध माझ्या शिवाय होणार नाही. आणि त्याचा योग्य वापर विरोधात करून न्याय मिळतो.हे कटू सत्य आहे.

 

निषेध केल्याने अन्यायाला वाचा फुटून नवीन इतिहास घडविता येतो. तेव्हा आपणा सोबत सर्व जग, मीडिया, डोळे विसफारून पाहतं.

म्हणूनच आपल्या न्याय व्यवस्थेत कायदेशीर वकील यांना काळा कोट वापरण्याचा बहुमान मिळाला आहे.

रंग हा सृष्टी चा अविभाज्य घटक आहे. रंगा शिवाय आपल्या जीवनात काहीच मज्जा नाही. म्हणून च की काय आपण निरनिराळ्या रंगाची  रंगपंचमी मोठया आनंदात उत्साहात साजरी करतो. सर्व एकमेकांना राग रुसवे विसरून आनंदात न्हाहून जातो.

 

काळा रंगा मुळे कित्येक वाईट गोष्टी या अपशकून समजल्या जायच्या पण आज मात्र  'काळा रंग ' कोणत्याही मोट्या सोहळ्यात अथवा कॉर्पोरेट जगतात महागडे कोट, जॅकेट, सारी, भिन्न वस्त्र रूपात घालून लोकं मिरवतात. म्हणजेच काय आज काळा रंग  श्रीमंत झाला आहे. मोठ मोठया फॅशन शो मध्ये फक्त काळा रंग ही थीम असते.

 

खरेच जर काळा रंग नसता तर, सृष्टी झोपली असती का? जग  कसे असेल हा आपण विचारच करू शकत नाही.

 

सुदैवाने आज आपल्या देशात नव्हे काळा रंग, सर्व जगतात. आपली ख्याती वाढवीत आहे. पूर्वी "काळा रंग " लोकांना दृष्ट, वाईट, अपशकुनी, वाटायचा. पण आज हाच  ' काळा रंग ' बरेच उंच व्यक्तीमत्व असणाऱ्या मुळे खुप यशस्वी झाले आहेत उदाहरण म्हणायचे तर. क्रिकेट मधील वेस्ट इंडीज चा ब्रायन लारा, विवियन रिचड्स,भारताची धावपटू पि टी उषा,  नेल्सन  मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्राध्यक्ष होते. असे बरेच आहेत

 

हल्ली काळ्या रंगा वर विशेष टीव्ही सिरीयल बऱ्याच चॅनेल वर येऊ लागल्या आहेत. लोकं जन माणसात काळ्या रंगावर प्रेम करू लागले आहेत. पूर्वी च्या जुन्या विचाराच्या लोकांना काळ्या रंगा च्या मुली, मुलं, लग्नासाठी नको असायच्या फक्त नी फक्त गौऱ्या रंगावर लोकं भाळायची, व त्यांना मोठं स्थान द्यायची.

आज सर्व जग बदललं आहे. गौऱ्या रंगा वर प्रेम करणारे आज काळ्या रंगा चा ही तितकाच आदर आणि प्रेम करू लागले आहेत. बऱ्याच क्षेत्रात आज काळ्या रंगा ने आपली छाप पाडली आहे. आणि आज तो प्रतिष्टेचा रंग झाला आहे.

होळी आली की बरेच रंग आपण उधळतो, आणि  सर्व वाईट प्रऊत्ती आपण आगीच्या काळ्या राखेत सपंवून टाकतो.

आपण काळ्या रंगा बद्दल, मतं,वाईट विचार, वृत्ती, द्वेष, दुर्गुण, हे विसरून  " काळा रंग " यश, आणि अंधारातून प्रकाशा कडे नेणारा आहे असे मानू या.

 

काळ्या रंगा बद्दल आपण कितीही तिटकारा केला तरी. मरणा नंतर  तो काळा कावळा शिवल्या शिवाय काही मोक्ष नाही.

 

आपल्या पूर्वजानीं त्यांना पितृपक्षात त्यांना पंचपक्वने बनवून जेवू घालायची प्रथा कायम जी ठेवली आहे. तेव्हा म्हणावे वाटते.

 

" काळा कुट्ट कावळ्या चे कार्या समयी नाव घावें,

 

काव काव हाक मारुनी मनोभावे जेवू घालावे "

 

बऱ्याच काळ्या सावळ्या रंगाची गायली गाणी,

 

काळाप्रमाणे संगीत, गीतकार ही आता महती जाणी...

 

 

 

पुन्हा एकदा आपणां सर्वा सोबत.

जीवदान देणाऱ्या " शेतीस.

 

काळ्या आईस.  

 

" माझी काळी आई, धन धान्य देई "

 

बोलून साष्टांग दंडवत..

 

                           

                                    : समाप्त :

                                श्री.लव क्षीरसागर

                              मोबाईल  : 9867700094

                                   विक्रोळी.मुंबई.

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू