पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मराठी भाषा संवर्धन काळाची गरज

मराठी भाषा संवर्धन काळाची गरज (लेख)

        भारतातील प्रमुख २२भाषांपैकी मराठी भाषा एक आहे.महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांची ही अधिकृत राजभाषा आहे.मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी आणि

 भारतातील चौथी भाषा आहे.२७फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरवदिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा (कुसुमाग्रज)जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहिर करणारा दिवस ' मराठी राजभाषा अधिनियम -१९६४ सर्वप्रथम ११जानेवारी१ ९६५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

     ' लाभले आम्हांस भाग्य,बोलतो मराठी।' मराठी बोलतो किंवा ती बोललीही जाते ,परंतु वर्षातून फक्त १ दिवसच तो म्हणजे २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमी ने या कामात पुढाकार घेऊन ' कुसुमाग्रजांना 'मराठी भाषेचा कोहिनूर 

म्हणून संबोधल जातं.कारण त्यांचा व्यासंगच इतका मोठा आहे की त्याबद्दल जितके आपण लिहू किंवा बोलू तितकं कमीच. अनेक मराठी भाषिक भाषा दिवस साजरा करतात परंतु फार कमी लोकांना हे ठाउक असावे की ,जगभरातील ब-याच भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला आहे आणि मराठी भाषेचा उगमसुद्धा संस्कृत भाषेतूनच झाला आहे.महाराष्ट्रातील बहुतांश लोकांची मातृभाषा मराठी आहे.परंतु दर १२कोसावर ही बदलत असते.प्रत्येक प्रांताची निराळी भाषा आहे .लेखी भाषा तीच आहे परंतु बोली भाषेत मात्र फरक जाणवतो.मराठी भाषेतच -कोकणी भाषा,घाटावरची भाषा,खानदेशातील भाषा ,ऐराणी भाषा ,गोव्याची भाषा वेगवेगळी आहे.

           खरंतर ,मराठी भाषा ही अत्यंत लवचिक भाषा आहे..थोड्या- थोड्या फरकाने ती वेगळी जाणवते.आजकाल तर मराठी शुद्ध मराठी राहिली नाही. त्यात हिंदी ,इंग्रजी शब्दांची भेसळ आहे.खेड्यातील बोलीभाषा रांगडी,अशुद्ध असली तरी त्यात आपलेपणा जाणवतो.तरूण पिढी सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करत आहे . इंग्रजी भाषेचे मराठी भाषेवरचं वर्चस्व जाणवायला लागलं आहे.त्यामुळेच आज समाजात मराठी भाषेला प्रतिष्ठित भाषेचा मान मिळाला नाही. आज मराठी भाषा खूप कमी प्रमाणात बोलली जात आहे आणि असच जर चालू राहिलं तर मराठी भाषा बोली भाषेतून हळूहळू का होईना विभक्त व्हायला फारसा.वेळ लागणार नाही. म्हणूनच 'मराठी भाषेचे संवर्धन करणे' ही काळाची गरज झाली आहे.

       मराठी भाषा ही संस्कृत आणि तामिळ सारखीच अभिजात आहे.साधारणतः २३००,वर्षांपूर्वी पण ही भाषा बोलणारे लोक होते.म्हणजेच फार पूर्वीपासून मराठी भाषा प्रचलित होती ' मराठी भाषा ' ही ख-या अर्थाने महाराष्ट्राची ओळख आहे अस म्हटलं तर त्यात फारसं वावग ठरणार नाही. मराठी साहित्याचा इतिहास फार मोठा आणि जुना आहे.याच भाषेत आपली संतपरंपरा आढळून येते .या भाषेनेच आपल्याला 'कुसुमाग्रज, बा.भ.बोरकर,शांता शेळके,केशवसुत, गो. नि .दांडेकर प्र .के.अत्रे ,पु ल.देशपांडे यांसारखे अनेक मोठमोठे लेखक दिले,रणजित देसाई, शिवाजी सावंत,बाबासाहेब पुरंदरे यांसारखे ऐतिहासिक साहित्यिक दिले.

     मराठी साहित्याची ओळख करून घेणे आणि आजच्या तरूण पिढीला ओळख करून देणे गरजेच आहे.केवळ आपल्या बोलण्यातूनच नव्हे तर आपल्या आचार-विचारातून देखील मला भाषा दिसायला हवी

तरच मराठी भाषा ख-या अर्थाने समृद्ध होईल.ही जबाबदारी खरंतर आजच्या तरूण पिढीची आहे.तरूणपिढी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाते व तेथील बोली आत्मसात करते. काही हरकत नाही परंतु आपली मायबोली सुद्धा बोलावी, जेणेकरून पुढची पिढी ती आत्मसात करेल.परदेशातून परत येताना आपल्या मातृभाषेचा विसर पडता कामा नये.' ने मजसी ने परत मातृभूमीला ,सागरा प्राण तळमळला ,सागरा! '

असं म्हणणा-या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश आहे.परदेशी जाउनही आपली मातृभाषा आपल्या देशावर अतोनात प्रेम करणारे लोक याच महाराष्ट्राने दिले आहेत. म्हणूनच मराठी भाषेचा जागर करून तिचे संवर्धन करून तिला परत एकदा समाजात रूजवण्याचा आणि प्रतिष्ठित भाषेचा मान मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

        एखादा दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करण सोपं आहे.पण आपण मराठी भाषा टिकावी म्हणून काही प्रयत्न करत आहोत का?किंवा कोणते प्रयत्न करायला हवे ते पाहू.

  मराठीतील आद्य ग्रंथ म्हणून ' ज्ञानेश्वरी 'चा उल्लेख करतात. मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील 'भगवद्गीता' प्राकृत.भाषेत अनुवादित केली.त्यात संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

' माझ्या म-हाटीचि बोलु कवतुके।परि अमृतातेही पैजेसी जिंके।'

    ' जिथे पिकतं तिथ विकत नाही 'अशीच काहीशी गत 

महाराष्ट्रात मला भाषेची झाली आहे.ज्याप्रमाणे आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवत नाही. पण परदेशात गेल्यावर किंवा परप्रांतात गेल्यावर त्याच मराठी भाषेचे दोन शब्द ऐकण्यासाठी आपले कान आसुसले असतात. हेच नाते,हेच अदृश्य धागे आपले मायमराठीशी जोडले आहेत.

      आपली भाषा जागतिक पातळीवर कुठेतरी मागे पडली आहे हे आता सतत प्रकर्षाने जाणवत आहे.भाषेच्या शुद्धतेला आपण पारखं होतोय.आपली भाषा समृद्ध करण्याचा तिलाही जागतिक पातळीवर उंचावण्याचा प्रयत्न आपण करायलाच हवा.तिचं अस्तित्व अबाधित ठेवायला हवं परंतु होतं काय याच्या उलट वेळप्रसंगी आपणच आपल्या भाषेला मागे सारून परकीय भाषेचा स्वीकार करू लागलो.त्याचे मुख्य कारण हे पण आहे की आपला देश जरी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तरी इंग्रजी भाषेचे प्रभूत्व मात्र सोडून गेला. आपण आपल्या मुलामुलींना इंग्रजी शाळेत शिकवणे प्रतिष्ठा मानू लागलो खरंतर मातृभाषेत मुलं लवकर शिकतात.मातृभाषा जर ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल.परंतु पालकांना वाटतं परकिय

भाषेवर प्रभुत्व मिळवले तर मुलांचा योग्य विकास होतो.

         आजकाल सर्वदूर इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आपल्याला दिसत आहे.एकमेकांना भेटल्यावर बोलताना 'हाय ,हैलो 'असच बोलल जात .कामाच्या ठिकाणी पण कागदपत्र इंग्रजी भाषेत जास्त आढळतात. महाविद्यालयात आता इंग्रजी बरोबरच फ्रेंच,रुस,जर्मन वगैरे अनेक दूसऱ्या भाषा शिकवल्या जातात.मात्र या भाषा शिकवतांना मराठीभाषा हा पण विषय ठेवावा आणि कमीत कमी महाराष्ट्रात तरी आवश्यक भाषा असा वापर हवा जसे की इंग्रजी ह्या विषयात पास व्हावेच लागते तस मराठीत पण पास झालच पाहिजे. असा नियम महाविद्यालयात शाळांमध्ये करावा .तरच मराठी सुरक्षित राहिल.

               सौ ऐश्वर्या डगांवकर .इंदूर 

                    मध्यप्रदेश.

               ९३२९७३६६७५.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू