पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

lमराठी भाषादिनाच्या निमित्ताने

  • मराठी भाषा खूप समृद्ध आहे. तिच्या आजच्या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत. 
  • मराठी भाषेचा उगम हा इसवीसन पूर्व 300 असावा कारण पाली भाषेचा ऱ्हास आणि इतर भाषांचा विकासाचा हाच कालखंड मानावा.
  • ब्राम्हण किंवा पंडित किंवा त्याकाळचे साहित्यिक संस्कृत बोलतं असले तरीहि सामान्य बहुजन हे प्राकृत भाषा बोलतं असताना, पाली, संस्कृत, प्राकृत ह्यातील सरमिसळींनी मराठी भाषा जन्माला आली. 
  • पाली या प्राकृत भाषेतील शब्दांचा अपभ्रश आज हि 2000 वर्षे टिकून आहे 
  • जसे तृण =तण,  प्रवुश =पाऊस 
  • तर काही वर्ण संस्कृतातून जसे च्या तसे घेतले
  • ऋ तर स्वर संधीतून औ

  • रवींद्र इंगळे चावरेकर संशोधित 'सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास' ह्या पुस्तकात अनेक गोष्टी अभ्यासपूर्ण मांडल्या आहेत.


  • खिलजी आक्रमणात संदेश वाहनासाठी मराठी, तामिळ तेलगू कन्नड भाषाच वापरली गेली असावी कारण पुढे ह्याच भाषांनी समाज एकत्र बांधला. 

  • प्राध्यापक दामोदर मोरे त्यांच्या लेखात म्हंटले कि साहित्यिक म्हणजे लिखित साहित्याइतकीच  वाङ्मयानी मराठी भाषा हि ज्यास्त समृद्ध झाली.
  • लोकगीते, वाक्प्रचार आजही त्यामुळे नितनुतन आणि नाळ जोडतात. 
  • संतांच्या ओव्या आणि अभन्ग लिखित जरी असले तरी घरोघरी जात्यावर दळताना ते मौखिक होऊन जनमानसात रुजले. 
  • 11व्या शतकातील  महानुभाव पंथातील मराठी भाषा हि थोडी वेगळी आहे. ह्यातून वर्हाडी जी मराठीचीच उपभाषा आहे तिचा विकास झाला.
  • नंतर पुढे संतांची कामगिरी तर आपल्याला माहित आहे 

  • महानुभाव पंथाचे प्रमुख संस्थापक श्री चक्रधर यांनी आपला उपदेश मराठीत केल्यामुळे त्यांच्या पंथायांनी मराठीत ग्रंथरचना केली. हे मराठीतले आद्य ग्रंथ होत. मुकुंदराजाचे विवेकसिंधु व परमामृत आणि ज्ञानदेवांची भावार्थदीपिका नामक गीतेवरील टीका हे त्या काळचे वेदान्तविषयक मराठी ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत.
    असा हा  2000 वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक वारसा असलेली मराठी भाषा खिलजी, तुघलक हि नष्ट करू शकले नाहि. 
    एक नाथांची भारुडे नंतर च्या काळातील पोवाडे, 
    होनाजी सारखे शाहीर ह्यांनी सामाजिक प्रगल्भते भरच टाकली. 
    भारुडा पासून लावणी पर्यंत आणि लोकगीता पासून भावगीत 
    ग्रामगीता, अखंड आणि आधुनिकी कविता, G.A.आणि वपुंच्या कथा. नाटककार तर अगणित आहेत. 
     
  • असा हा  2000 वर्षांपूर्वीचा सांस्कृतिक वारसा असलेली मराठी भाषा खिलजी, तुघलक हि नष्ट करू शकले नाहि. 
  • एक नाथांची भारुडे नंतर च्या काळातील पोवाडे, 
  • होनाजी सारखे शाहीर ह्यांनी सामाजिक प्रगल्भते भरच टाकली. 
  • भारुडा पासून लावणी पर्यंत आणि लोकगीता पासून भावगीत 
  • ग्रामगीता, अखंड आणि आधुनिकी कविता, G.A.आणि वपुंच्या कथा. नाटककार तर अगणित आहेत. 
  •  आता जबाबदारी आपल्यावर आहे. साहित्याची उंची आणि समाजाला परत चांगले आणि दर्जेदार साहित्य देणं ज्याने मराठी भाषा हि इंग्रजी इतकीच प्रवाही होईल. 













पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू