पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी माय मराठी

*माझी मराठी माय*


जन्मताच घेतलेस जवळ मला

 विसरेन तुला मी काय ?

मी लेकरु तुझे ग तान्हे 

*तू माझी मराठी माय* .....


आक्रमणे कितीदा झाली

भाषेची वारंवार 

 परभाषेच्या शब्दांनी

किती केले तुजवर वार

कुशीत तुझ्या शिरुनी वाटते

रडावे मोकलून धाय


मी लेकरु तुझे ग तान्हे 

*तू माझी मराठी माय.*....


वेचीन काटेकुटे येथले 

आसमंत होईल ताजा

शब्दसुमनांनी आई गे

मग बांधीन तुझी पुजा 

जपेन तुला जीवापाड मी

 जशी दुधावरची साय 


मी लेकरु तुझे ग तान्हे 

*तू माझी मराठी माय*.....


            अरविंद कुलकर्णी , पिंपरखेड कर, पुणे 

          दिनांक २७/०२/२०२२

          मराठी राजभाषा दिन

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू