पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

व्हावी सुखद पहाट

*व्हावी सुखद पहाट*


कसे कोठून हे आले
आगंतुका परी दु:ख
हर्ष आनंद ही सुख
सारं झालं फिकं फिकं॥धृ॥


जीवनाला अवघ्याचं
केलं याने रुखं सुकं
कुठे कशी केंव्हा झाली
काही कळेनाच चूक।॥१॥


याने व्यापलं व्यापलं
क्षितीजही काठोकाठ
जीवनाची पुरतीच
याने लावलीसे वाट॥२॥


सुखे सुखावता येते
लागलीच पाठोपाठ
कसे करावे हे पार
यत्न झाले आटोकाट॥३॥


सुख शांती वर असे
येते कोठून सावट
अंत झाला प्रतिक्षेचा
व्हावी सुखद पहाट॥४॥


*--निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.*
*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
<><><><><><><><><><><><><><>

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू