पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चैत्राची चाहूल

              चैत्राची चाहूल

  आला आला चैत्रमास, उभारून गुढ्या तोरणे खास
  सकलजन झाले सज्ज, नववर्षाच्या स्वागतास 
  
  आला आला चैत्रमास, घेऊनी फुलांची ग रास  
  भिडला सुगंध गगनास, सुंदर साजिरा मधुमास  

  कोकिळेचे मधुर कूजन,सवे वायूचे गुंजन  
  मधुरसाचे ग सेवन,करिती भ्रमर आनंदून  

  दारा बांधले तोरण,रेखिले अंगणी चैत्रांगण
  चैत्रगौरीचे ग पूजन,होई घराघरांतून  
  
  फुलाफुलांची आरास, उदबत्तीचा ग सुवास  
  नैवेद्या भोजन सुग्रास, चैत्रगौरी साठी खास  
 
  भगिनीवर्गाची लगबग,देण्या हळदी कुंकवाचे आमंत्रण  
  या ग या सख्यांनो,करू गौरी सोहळा आपण  

  हळदी कुंकवाचा ग सोहळा, भगिनी झाल्या ग गोळा  
  आंब्याच्या डाळीसोबत, आनंद पन्ह्याचा घ्यावा  

  वृक्षवेलीस ग येई, मोहोर पाचूच्या पानांचा  
  होई उत्सव साजरा, वसंताच्या आगमनाचा  
  
  आसमंती बहरे वसंत,होई हर्ष हृदयस्थ  
   चैत्र महिन्याचे गीत,होई होई हे कंठस्थ

©️®️ ऋजुता देशमुख

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू