पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

‍‌हलद

 

“वेदा हळू ना ग पडलीस तर…??” 

“काही नाही होत ग आजी मला सांग ताई कुठेय…????” 

“ती तुझ्या खोलीत आहे…” 

“ ओके.. बाय गुड नाईट…” 

“ जास्त वेळ जागू नका ग.. लक्षात असूदेत परवा ला हळदी आहेत ताईच्या….” 

“हो…” 

वेदा पळत सुटली तिच्या खोली कडे.. कधी एकदा ताई ला भेटते अस झाल होत तिला… ती रुम मध्ये पोहचली 

“ताई…..” 

“अग हो ग… लाड नंतर आधी जरा बोलायच आहे तुझ्याशी ..” 

“हा… बोल… हे अचानक लग्नाच काय..??? आणि तू तयार कशी काय तयार झालीस…???” 

“ताई कधी ना कधी करायचं होतच की मग म्हणल काय हरकत आहे…”

“वेदा तू वेडी आहेस का…??? अस करायच म्हणून लग्न करतात का..??? खर सांग मनापासून तयार नाहीस ना लग्नाला..???” 

“ताई तस काही नाही आहे ग… ते आहेत की चांगले आणि कशाची कमी ही नाही आहे..  मग आणखी काय हव असत ना..?? प्रेम होईल ग नंतर..” 

“अजून शार्दूल ला विसरली नाही ना..???? खर बोल वेदा…” 

“ताई… काही काय… शार्दूल ला लक्षात ठेवण्यासारख काही नव्हतच” वेदा ताई समोरुन उठली आणि खिडकीपाशी गेली… हलकेच डोळ्याच्या ओल्या झालेल्या कडा पुसल्या… 

“खोट ही निट बोलता येत नाही तुला.. अग का लपवतेस मग..??” ताई खुप वैतागून बोलते.. 

“काय खोट आणि काय खर हे मलाच कळत नाही ताई… आणि आता ते जाणून ही घ्यायच नाही…  “ 

“ पण मला जाणून घ्यायच आहे… बोल काय झालय…” 

“ताई, त्याला म्हणजे शार्दूल ला काहीच नाही वाटत ग तस माझ्या बद्दल.. मग काय उपयोग या सगळ्याचा…” 

“तो म्हणाला का तस..???” 

“नाही…” 

“मग तूच ठरवलस सगळं ..??? वेडे लग्नानंतर प्रेम होत पण आपण ज्या माणसावर प्रेम करतो ना त्यासोबत लग्न करण खुप कमी लोकांच्या नशिबी असत…” 

“ताई.. मला मान्य आहे पण…  ताई सांगू का तुला खर अगदी..” 

“सांग.. मनातल सार काही बोल…” 

“ताई, शार्दूल मला भेटला तेव्हा तो माझ्या NGO ची documentry करायला आला होता… जवळ जवळ २ आठवडे आम्ही एकत्र काम करत होतो… रोज भेटायचो खुप आवडला होता तो मला.. कदाचित माझ्या डोळ्यांतून त्याला जाणवल्या ही असतील माझ्या मनातल्या भावना... पण हे सार बोलून कधीच दाखवलं नाही मी.. मला बाजार नाही मांडायचा माझ्या भावनांचा..  त्याला जर काहीच नसेल वाटत तर.. ताई जे झालय ते झालय पण आता या सगळ्याचा काय उपयोग.. ताई साखरपुडा होईल माझा आता आणि लगेच लग्न… मी संपवल आहे सार ताई..” 

“एकदा बोलून बघशील का त्याच्याशी… माझ्यासाठी..” 

“ताई पण.. आता कस शक्य आहे.. घरी काय सांगायचे..??” 

“मी सांभाळेन घरच.. मी समजावेन सगळ्यांना.. तू फक्त एकदा बोल..” 

“नको ताई..” 

ताई ने तिच्या फोनवरून शार्दूल ला फोन ही लावला… 

“हा शार्दूल… मी बोलते वेदा..” 

“हा वेदा बोल ना,. आता फोन केलास.. Is everything fine..???” 

“yah absolutely .. actually…” 

“yah m listening speak up..” 

“मला बोलायचं आहे थोड…” 

“हा बोल ना… काय झालं…??” 

“आपण भेटूयात का उद्या प्लिज..” 

“उद्या.. हा चालेल.. कधी सांग न प्लेस पण..” 

“मी कळवेन तुला उद्या सकाळी ..””” 

“ओके.. I will wait..” 

“bye,,” 

“hey veda. नक्की काही problem नाही ना…????” 

“हो नक्की” 

“bbye then,, See u tomorrow” 

वेदा ने फोन ठेवला.. आणि ताईकडे पाहील.. 

“शांत हो.. मला सांग त्याला माहीती आहे का की तुझ लग्न ठरल आहे ते..” 

“नाही.. मी बोलते कुठे त्याच्याशी..” 

“वेदा तू ना… अशी कशी ग तू… जिवापाड प्रेम करतेस मग का अशी लांब राहतेस..?? तुला राहवत तरी कस ग…???” 

“ताई, प्रेम मनापासून करायला हव ना… आणि मग तुम्ही भेटला काय नाही भेटला नाही बोलला काय नाही बोलला काय ते कमी होता कामा नये.. वाढल पाहीजे प्रत्येक मिनीटाला… नजरेत दिसल पाहीजे तुमच्या.. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी असते..” 

“वेडी आहेस… उद्या सांगून टाक.. काय होईल ते होईल..” 

“लग्न आहे ताई माझं लग्न ठरल आहे आणि तू मला हे काय सांगती आहेस..” 

“आयूष्यभर सलत राहील मनाला तुझ्या.. त्यापेक्षा बोलून रिकाम व्हाव..” 

वेदा थंड चेहर्याने ताईकडे पाहत होती.. काय बोलायचं कळत नव्हते तिला.. 

“चल. झोप आता..” ताई म्हणाली.. 

वेदा झोपायला तर गेली मात्र झोप येते कुठं.. एकीकडे ज्याच्यावर जिवापाड प्रेम केल तो होता.. तर दुसरीकडे घरचे होते.. खरतर वेदा ला हे लग्न नव्हत करायचं पण त्याशिवाय आपण शार्दूल ला विसरता येणार नाही अस ही तिला वाटत होत.. म्हणून तर ताई च्या लग्नाच्या घाईत आलेल्या स्थळाला वेदा हो बोलली होती..  शार्दूल ची अवस्था ही काही वेगळी नव्हती.. हिने अचानक अस का बोलवल आसेल याचा सार्या बाजूने विचार केला होता त्याने... दुसऱ्या दिवशी तो लवकर office मध्ये गेला.. 

     वेदा पार्लरमध्ये जाते अस खोटं कारण सांगून कसबस बाहेर पडली..  शार्दूलच्या office मध्ये भेटायला गेली..  

“अग तू प्लेस कळवणार होतीस ना…” 

तिला अचानक आलेल पाहून तो थोडा गोंधळला..  ती मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती.. शार्दूल बारीक थोडाफार उंच किंचित सावळा.. अगदी वेदा ला शोभेल असा.. वेदा त्याच्या डोळ्यात हरवायची.. आजही हरवली होती… 

“वेदा.. अग तु इथे..??” 

स्वतःला भानावर आणत वेदा म्हणाली.. 

“हा.. म्हणल इथेच भेटू..” 

“हा.. बर बस आधी..” 

“हा.. ऐक ना.. मला बोलायचं आहे तुझ्याशी…” 

“हा..  अग बसून बोल ना…” 

“शार्दूल… मला I mean to say  माझं लग्न ठरल काल..” 

तिचं लग्न ठरल हे ऐकून शार्दूल ला धक्का बसला..  खरतर शार्दूल ला ही ती कुठेतर आवडत होती.. थोडे दिवस गेले की मग तिला मनातल सांगून टाकायचं अस ठरलं होतं त्याच.. पण आता अस हे अचानक लग्न… तो खुप गोंधळून गेला. 

“शार्दूल ऐकतो आहेस ना..?? “ 

“हा.. अचानक लग्न..  कस काय..,?” 

“ठरल आता…” 

“हेच सांगायचे होते का,.??” 

“हा… आणखी..” 

“आणखी काय..??” 

“I like you” 

आता मात्र शार्दूल ला पुन्हा धक्का बसला.. 

“काय..?? अग…” 

तो काही बोलायच्या आत च ती पुन्हा बोलू लागली… 

“मला माहीत आहे मी तुला आवाडत नाही.. कदाचित तुझ्या आयुष्यात दुसर कोणीतरी असेल ही.. पण सांगितलं नसत तर जास्त त्रास झाला असता मला… मी निघते उद्या हाळदी आहेत ताईच्या आणि माझ्या लग्नाची पक्की बोलणी… बाय्…” 

ती निघून जाण्यासाठी वळली.. तो नकार च देणार अस पक्क ठरवल होत तिनं.. ती वळल्यावर शार्दूल ने तिचा हात धरला.. ती दचकली.. तिने मागे वळून शार्दूल कडे पाहीले… 

“सगळ स्वतः च ठरवतेस की ग.. म्हणजे मी तुला आवडतो हे तूच ठरवलस आणि माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी असेल हे ही तूच ठरवलस.. आणि पुन्हा दुसऱ्या सोबत लग्न करायचं हे ही तूच ठरवणार..” 

“म्हणजे..??” 

“म्हणजे जर नसेल माझ्या आयुष्यात कोणी आणि मला तू आवडत असशील तर..?” 

“खरच..??” 

डोळ्यातील पाणी पुसत वेदा ने विचारले… 

“अग.. बोलून कुठं देते तु समोरच्या माणसाला..” 

“मला कळणार कस पण.” 

“दिसल नाही का कधी माझ्या नजरेत..?” 

वेदा लाजली आणि अलगद त्याला बिलगली.. 

“अग… तूच म्हणतेस ना खर प्रेम नजरेत दिसत म्हणून..” 

“हमम.. मला वाटल… असेल तुझी कोणीतरी..” 

“वेडाबाई…” 

“बरं.. चल मी निघते… हळदी ची काम आहेत मला..” त्याच्यापासून लांब होत वेदा म्हणाली… 

“थांब ना अजून थोडावेळ… हळदी ची काय आलेत काम..” 

“असतात काम..” 

“बर मला सांग… हळद का खेळतात ग..” 

“ आजी म्हणते एकदा का हळद लागली की त्याच मुलाशी लग्न कराव लागत.. ज्याच्या नावाची हळद लावतात..” 

“अस का.. मग..” 

त्याने महालक्ष्मीच्या समोरची चिमुटभर हळद वेदा च्या गाली लावली.. 

“अरे काय करतोयस..?? सुटका नाही आता तुझी माझ्या सोबत च लग्न कराव लागेल..” 

वेदा हलकेच लाजली… अलगद आपल्याला लागलेली हळद त्याच्या गाली पुसत म्हणाली 

“अस असेल तर मग तुझी ही सुटका नाही…” 

शार्दूल ने तिला पुन्हा जवळ घेतले…  आणि म्हणाला, 

“मी बाबांना घेऊन येईन उद्या घरी.. कांदेपोहे तयार ठेव..” 

वेदा लाजून फक्त हुंकारली….. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू