पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

गुढी पाडवा

गुढी पाडवा


सण गुढी पाडव्याचा आला
घेऊन संदेश आनंदाचा
दिन नववर्षाचा सौख्याचा
गुढ्या तोरणे चला उभारू
स्वागत नववर्षाचे करू
सडा शिंपूनी , रांगोळ्यांनी
शोभित अंगणा करुनि
नूतन वस्त्रे धारण करुनि
गोड नैवेद्य घेऊनि
मंदिरी दर्शनास जाऊ
कडुनिंब अन् आम्रतरू
आनंदाने लागले बहरु
सृष्टी नवचैतन्ये मोहरू
सेवन करू कडुनिंबाचे
रोग जातील पळुनी ॥
जाति, धर्म, भेद विसरोनी
करू या सण साजरा मिळोनी
होऊ दे नवा सूर्योदय
अवघे विश्वचि अपुले घर
सारे राहू एकदिलानी ॥
गोड धोड नैवेद्य गुढीचा
हाच संदेश गुढी पाडव्याचा

सुलभा गुप्ते .
२ एप्रिल २० २२
गुढीपाडवा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू